'मुलगी गमावतो तेव्हा...' लेकीच्या लग्नानंतर आलियाच्या आईच्या भावना...

 'मुड के ना देखो दिलबरो...' तो दिवस अखेर अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यात आलाचं, पण आईच्या डोळ्यात पाणी...  

Updated: Apr 15, 2022, 10:12 AM IST
'मुलगी गमावतो तेव्हा...' लेकीच्या लग्नानंतर आलियाच्या आईच्या भावना... title=

मुंबई : 'मुड के ना देखो दिलबरो...' तो दिवस अखेर अभिनेत्री आलिया भट्टच्या आयुष्यात आलाचं.  मिस भट्ट्... आज  मिसेस कपूर झाली... दोन दिवस मोठ्या थाटात आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचं लग्न झालं. आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी मुलीची पाठवणी केली. 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरचं लग्न झालं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

अनेकांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. आलियाची आई सोनी राजदान यांनी देखील मुलगी आणि जावयाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

नव्या जोडप्याचं फोटो पोस्ट करत त्या म्हणाला, 'जेव्हा मुलीला गमावतो, तेव्हा एक मुलगा भेटतो... मी म्हणते आम्ही आमच्या कुटुंबात मुलाचं स्वागत केलं आहे... '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

त्या पुढे म्हणाल्या, 'आमचं कुटुंब... माझी प्रेमळ, सुंदर बेबी गर्ल कायम सोबत राहूदे... दोघांना लग्नाच्या प्रचंड शुभेच्छा... ' सध्या दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

दोघांना पाहून फक्त त्यांच्या चाहत्यांचं नाही, तर प्रत्येकाला प्रचंड आनंद झाला... बॉलिवूडची क्यूट डॉल आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे... आलियाला नवरीच्या रुपात पाहण्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती... नवरदेवाच्या रुपात रणबीरचा रुबाब देखील मस्तचं होता..