Alia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral

Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे.

Updated: Dec 29, 2022, 02:42 PM IST
Alia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral title=
Alia Bhatt Unseen Wedding and Pregnancy Photos

Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे. सध्या आलिया भट्ट मदरहूड एन्जॉय करताना दिसते आहे. त्यातच आता तिच्या लग्नाचे आणि प्रेग्नंन्सीचे (Alia Bhatt Pregnancy) काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये आलिया भट्ट आपल्या हटके अंदाजमध्ये दिसत आहेत त्याचसोबत तिच्या व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये फारच गोड दिसते आहे. तुम्हालाही तिच्या लग्नातले इनसाईड (Alia Bhatt Wedding Unseen Photos) फोटो पाहण्यात उत्सुकता असेलच तेव्हा चला पाहूया तिच्या लग्नातले इनसाईड फोटोज. तुम्हीही पाहून म्हणाल आलिया तर कशातच कमी नाही! (Alia Bhatt Secret Album alia bhatt shares her wedding and pregnancy unseen photos on social media see pics)

आलिया भट्ट सोशल मीडियावर एक्टिव असते त्याचबरोबर आपले अनेक पर्सनल फोटोज ती सोशल मीडियावर (Alia Bhatt on Social Media) शेअर करत असते. तिच्या इन्टाग्रामच्या फोटोंना लाखो लाईक्स येत असतात. मध्यंतरी तिनं आपले रणबीर कपूरसोबतचे वेकेशन फोटोजही शेअर केले होते. परंतु आता लग्नाला 9 महिने पुर्ण झालेले असतात. आलियानं आपले काही फोटोज शेअर केले होते. ज्यात तिनं आपल्या वेडिंग ड्रेस फिटींगचा एक फोटो तर आपल्या हळदीतला एक फोटो आपल्या इन्टाग्राम स्टोरीतून शेअर केला आहे. 

माय हळदी हेअर अशा कॅप्शनचा एक फोटो तर फर्स्ट फिटिंग फॉर माय वेडिंग असा दुसरा फोटो तिनं शेअर केला आहे. मध्यंतरी तिनं प्रेग्नंट असताचा एक फोटो शेअर केला होता जेव्हा ती हॉलिवूडचा आपला हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) हा चित्रपट शूट करत होती. 

Alia Bhatt Wedding and Pregnancy Unseen Photos

आपल्या प्रेग्नंन्सीच्या काळातलेही तिनं काही फोटोज शेअर केला आहे. ज्यात तिनं आपल्या तिसऱ्या महिन्यातील डाएटचा फोटो टाकला होता ज्यात ती ओट्सचा एका फोटो शेअर केला होता. त्याचसोबत तिनं स्विमिंग पूलमधलाही एक फोटो शेअर केला आहे. ज्यात प्रेग्नंट असताना आलियानं आपला स्विमिंग पूल एक्सरसाईजचा फोटोही शेअर केला आहे. 

आलिया भट्ट सध्या आपलं मदरहूड एन्जॉय करताना दिसते आहे. आलिया भट्ट लवकरच तिच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटात रणवीर सिंगसोबत लवकरच दिसणार आहे.