Alia Bhatt Receives Award At Saudi Arabia : अभिनेत्री आलिया भट्ट ही अशी एक अभिनेत्री आहे जिने आत्ता पर्यंत बॉलिवूडला ऐकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. आलिया ही बॉलिवूडमधील एट्रक्टिव्ह अभिनेत्री आहे. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिने तिच्या सिनेमातून दमदार अभिनयाच्या जोरावर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी तिचा सिनेमा 'गंगूबाई काठियावाड़ी'साठी नॅशनल अवॉर्डने सन्मानित केलं होता आणि आता तिला पुन्हा एकदा सौदी अरेबियामधील एका कार्यक्रमात अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. आलिया भट्टला सौदी अरेबियाध्ये अवॉर्डचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमात आलिया भट्ट्ने लाल आणि निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. ज्यावर गोल्डन वर्क केलं होतं. यासोबतच आलियाने मॅचिंग ट्यूब टॉप स्टाईल ब्लाऊज परिधान केला होता. आलियाने कानात मोठे झुमके घातले होते, तर केस मोकळे ठेवत आलियाने तिचा हा लूक पूर्ण केला. पुरस्कार स्विकारत आलियाने सांगितलं की, ''या देशात असणं माझ्यासाठी माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे, जो देश सध्या आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आणि सिनेमाच्या नावावर सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी खूप काही करत आहे. असं नेहमी होत नाही, जिथे पश्चिम आणि पूर्वेकडील असंख्य प्रतिभा एकाच छताखाली एकत्र येतात आणि एकमेकांचा आनंद साजरा करतात असं सहसा घडत नाही. त्यामुळे हे केल्याबद्दल धन्यवाद.'''
मला सिनेमाचं वेड आहे.
आलिया पुढे म्हणाली, ''माझ्यासाठी ही एक स्पेशल रात्र आहे. मला सिनेमांच वेड आहे, मला फक्त एवढंच माहिती आहे. मी हे आधीही सांगितलं आहे की, जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा मी, लाईट्स कॅमेरा एक्शनवर आली होते. माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ हाच आहे. जर खुशी विषयीबद्दल बोलायचं झालं तर, आपल्या जीवनातील सगळ्यात मोठी गोष्टीपैकी एक म्हणजे प्रेम आहे. यासाठी आज रात्री जेव्हा मी घरी परत जाईन तेव्हा मी माझ्यासोबत माझ्या सिनेमांच प्रेमा आणि ते प्रेम घेवून जात आहे. जे मी ईथे अनुभवलं. तर खूप खूप धन्यवाद आणि ईथे सिनेमांची जादू कायम आहे.''
जिगरा सिनेमात झळकणार आलिया भट्ट
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, जिगरा या तिच्या आगामी सिनेमात ती झळकणार आहे. आलियाने स्वत: तिचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या आगामी सिनेमाची माहिती तिच्या प्रेक्षकांना दिली होती. वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा'चा 27 सप्टेंबर, 2024 प्रदिर्शित होणार आहे.