आलिया भट्ट वादाच्या भोवऱ्यात, कारवाई होण्याची शक्यता

आलिया भटच्या अडचणीत वाढ....  

Updated: Dec 17, 2021, 09:02 AM IST
आलिया भट्ट वादाच्या भोवऱ्यात, कारवाई होण्याची शक्यता title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भटच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. होम क्वारंटाईन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आलियावर महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. क्वारंटाईन काळ पूर्ण न करता आलिया भट एका कार्यक्रमासाठी दिल्लीत गेली होती. ती मुंबईत परतल्यानंतर मुंबई महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. करण जोहर याच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. 

या पार्टीत आलियासह करीना कपूर, अमृता अरोरा, महीप कपूर, सीमा खान यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पार्टीनंतर करीना कपूर, सीमा खान, अमृता अरोरा आणि महीप कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे करणच्या पार्टीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली. 

त्यात मलायका अरोरा आणि आलिया भट्टची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र तिला सात दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितलं होतं. त्या नियमाचं तिनं उल्लंघन केलं. त्यामुळे आलियावर कारवाई होते की नाही, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, करणच्या पार्टीमुळे सलमान खानच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान आधीच कोरोना पॉझिटिव्ह आहे. सीमा खाननंतर आता तिचा 10 वर्षांच्या मुलालाही बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.