Alia Bhatt : गंगूबाईनंतर सीतेच्या भूमिकेत आलिया....बर्थ डेला लूक रिलीज

गंगूबाई काठीयावाडी (Gangubai Kathiyawadi) सिनेमाच्या दमदार ट्रेलरनंतर आता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणखी एका नव्या रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Mar 14, 2021, 09:59 PM IST
Alia Bhatt : गंगूबाईनंतर सीतेच्या भूमिकेत आलिया....बर्थ डेला लूक रिलीज

मुंबई : गंगूबाई काठीयावाडी (Gangubai Kathiyawadi) सिनेमाच्या दमदार ट्रेलरनंतर आता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणखी एका नव्या रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RRR या सिनेमात सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट झळकणार आहे. मात्र ह्या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित नाही आहे. त्यामुळे आलिया भट्टच्या भूमिकेबाबत उत्सुकता कायम आहे. या सिनेमातील तिचा लूक उद्या म्हणजेच आलिया भट्टच्या वाढदिवशी (Alia Bhatt Birthday) रिलीज होणार आहे. स्वत: आलिया भट्टनेही (Alia Bhatt as Sita) यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे.

बाहुबली आणि बाहुबली २ सारख्या दमदार चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या एसएस राजामौली यांची ही RRR फिल्म असणार आहे. यामध्ये ज्यूनियर NTR, राम चरण आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असतील.

यातील एनटीआर आणि राम चरण यांचा लूक आधीच समोर आला आहे. मात्र आलियाच्या लूकचा सस्पेन्स कायम होता...मात्र आता त्याचीही प्रतीक्षा संपतेय. १५ मार्चला सकाळी ११ वाजता आलिया भट्टची सीता म्हणून लूक रिलीज होईल.

 

RRR हा एक अक्शन ड्रामा सिनेमा असणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीच रिलीज होणार होता, मात्र कोरोनामुळे त्याचं शूटिंग रखडलेलं होतं. आता हा सिनेमा १३ ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचं कळतंय. या सिनेमात अजय देवगण असल्याचंही समजतंय. या सिनेमाचा ट्रेलरही अजून प्रदर्शित व्हायचा आहे.