आलिया गुंडी आहे-महेश भट

 'गली बॉय' चित्रपटाचे व्हायरल होत असलेले एक मीम सोशल मीडियावर शेअर करत  वडील महेश भट यांनी आलिया भटला 'गुंडी' असे म्हंटले आहे,

Updated: Jan 12, 2019, 05:17 PM IST
आलिया गुंडी आहे-महेश भट

मुंबई: रणवीर सिंह आणि आलिया भटचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.  सिनेमाचे दिग्दर्शक जोया अख्तर, निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी पण त्यांच्यासोबत उपस्थित होते.  सिनेमात फटकळ स्वभावाची मुलगी असल्याची भूमिका आलिया भटने साकारली आहे. मुस्लिम मुलीची भूमिका आलिया भट बजावत आहे.तिच्या आशा स्वभावाची आणि कामाची सर्वत्र कौतूक होत आहे. चाहत्यांना तिचे हे पात्र फार आवडत आहे.हा सिनेमा बऱ्याच कारणांमुळे विशेष आहे 'गली बॉय'मध्ये चाहत्यांना अनेक गोष्टी एकत्र अनुभवायला मिळणार आहेत. ज्यामध्ये रॅप, हिप-हॉप संगीत आहे. मुंबईच्या झुग्गी-झोपडीमध्ये राहणाऱ्या दोन लोकांची ही गोष्ट आहे. जे नंतर देशातील मोठे रॅपर बनले. सिनेमाच्या एका डायलॉगमध्ये ''मेरे ब्वॉयफ्रेंड से गुलू-गुलू करेंगी तो धोपतुईंगी न उसको'' असे आलिया म्हणते.  रणवीर सिंहची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

 'गली बॉय' चित्रपटाचे व्हायरल होत असलेले एक मीम सोशल मीडियावर शेअर करत  वडील महेश भट यांनी आलिया भटला 'गुंडी' असे म्हंटले आहे, वडील महेश भट यांच्या या ट्वीटवर अजून आलियाची कोणतीही रिअॅक्शन आलेली नाही. 14 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय. ट्रेलर लॉन्चवेळी रणवीरने आपल्यासाठी हा सिनेमा अतिशय खास आहे, असे सांगितले. तो म्हणाला, जेव्हा मला 'गली बॉय' सिनेमाबद्दल सांगितले तेव्हा हा सिनेमा माझाच असल्याचे मी म्हणालो. जर माझ्या जागी अन्य कोणाला हा सिनेमा दिला गेला असता, तर मला वाईट वाटले असते.