मुंबई:अमेरिकेमध्ये नावारुपाला आलेली 'मी टू' मोहीम भारतात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. 'मी टू' मोहीमे अंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाचे आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. नुकताच झालेल्या मुलाखतीत राणी मुखर्जीला 'मी टू' मोहीमे संबंधित प्रश्न विचारला. महिलांनी स्वतःच स्वतःचीच जबाबदारी घ्यायला लागेल. यावर नेहा धूपियाने आपले मत मांडले.तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भारतात 'मी टू' मोहीमेला सुरूवात झाली.राजकारण,बॉलिवूड,आणि मीडिया मध्ये कार्यरत असणाऱ्या अनेकांवर 'मी टू' मोहीमे अंतर्गत हल्ले झाले. मुलाखतीत राणी मुखर्जीने 'मी टू' मोहीमे बद्दल आपले मत व्यक्त केले. पण दीपिका ते आलिया पर्यंत सगळ्यानी राणीला चूकीचे ठरवले.पण नेहा धूपियाने राणीची पाठराखण केली आहे.
नेहाने केली राणीची पाठराखण
'महिलांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असने गरजेचे आहे. आपल्यावर होणाऱ्या वाईट घटनांचा विरोध केलाच पाहिजे. पण मला असं वाटत की कोणाला अश्या गोष्टींचा सामना करायला लागू नये'.
काय म्हणाली राणी?
'मला असं वाटत की प्रत्येक महिलेने मनातून मजबूत झालं पाहिजे. प्रत्येक मुलीला मार्शल आर्ट यायला हवं. स्वतःला इतक मजबूत करा की कोणत्याही परिस्थित अडकल्यावर परिस्थितीचा हिमतीने सामना करता यायला हवा.महिलांनी स्वतःच स्वतःचीच जबाबदारी घ्यायला लागेल.
राणीच्या या वक्तव्यावर दीपिका पादुकोण म्हणाली,' बऱ्याच महिला शारीरिक दृष्ट्या मजबूत नसतात त्या स्वतःचीच सुरक्षा करू शकत नाही. अशा घटना लहान मुलींसोबत होतात'.