Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'चं रिलीज धोक्यात, 'ती' चूक ठरली कारण

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपटाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीने अल्लू अर्जुनचे चाहते निराश होण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Updated: Jul 17, 2024, 07:18 PM IST
Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'चं रिलीज धोक्यात, 'ती' चूक ठरली कारण title=

Pushpa 2 Update: अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' ची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' मध्ये रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. 500 कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु तो आता पुढे ढकलण्यात आला. 

त्यानंतर 6 डिसेंबर 2024 ला 'पुष्पा 2' रिलीज होणार होता. पण आता चित्रपटा संबंधित एक नवीन माहिती समोर आलीय. हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार नसल्याची ही बातमी आहे. कारण, या चित्रपटाचे शूटिंग व्यस्थित सुरु नसल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन नाराज झाला आहे. 

अल्लू अर्जुनने दाढी का कापली? 

अल्लू अर्जुनने दाढी केली आहे. त्यामुळे त्याच्या लुकमध्ये समस्या असू शकते. यासोबतच सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनने दाढी कापली असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे चित्रपट पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. 

2025 ला 'पुष्पा 2' रिलीज होणार

'पुष्पा 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अमेरिकेला गेले असल्याने उशीर झाला. अल्लू अर्जुन सुट्टीवर गेल्यामुळे देखील खूप वेळ वाया गेला. त्यामुळे या वर्षी देखील चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार नसल्यामुळे आता हा चित्रपट पुढच्या वर्षी ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

पुष्पा 2 ची रिलीजपूर्वीच कमाई

पुष्पा 2 चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने 1200 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. त्याचे थिएटर हक्क 570 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तसेच चित्रपटाचे ओटीटी अधिकार 275 कोटी रुपयांना विकले गेले असून ऑडिओ सॅटेलाइट अधिकार सुमारे 450 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.