आमिर खान याची लेक बॉयफ्रेन्डसोबत रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...

आमिर खानची मुलगी इरा खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Updated: Jul 17, 2021, 07:57 AM IST
आमिर खान याची लेक बॉयफ्रेन्डसोबत रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई : आमिर खानची मुलगी इरा खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आयरा खान आज चर्चेत आली ती तिच्या लव लाइफमुळे.  आयरा खानने फेब्रुवारी 2021रोजी बॉयफ्रेन्ड नूपुर शिखारेसोबत असलेल्या तिच्या नात्याला दुजोरा दिला. दोघे लव्हबर्ड्स कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रेमही मिळतं. आता देखील आयरा बॉयफ्रेन्डसोबत रोमँटिक फोटो शेअर केले. 

फोटोंमध्ये आयरा आणि नूपुर मस्ती करताना दिसत आहेत.  बॉयफ्रेन्डसोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'हा किती ड्रामेबाझ आहे' असं लिहिलं आहे. आयरा कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर तिचे अनेक चाहते कमेन्ट आणि लाईक्सचा वर्षव करतात. तर ही मात्र आयराला ट्रोल करतात. सांगायचं झालं तर इराने  व्हेलेंटाईन डेच्या आधी तिच्या आणि नूपुरच्या नात्याची अधिकृत घोषणा केली.  इशा कायम बॉयफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इरा एक अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे. 

कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.