तब्ब्ल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आजोबा झाले बिग बी; घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

बच्चन कुटूंबात छोट्या पाहुण्याचं आगमन झाल्यानंतर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Updated: Jan 22, 2023, 12:34 PM IST
तब्ब्ल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आजोबा झाले बिग बी;  घरी छोट्या पाहुण्याचे आगमन  title=

मुंबई : बीग हे बॉलीवूड असे अभिनेते आहेत ज्यांना महानायक म्हटलं जातं. अमिताभ बच्चन यांना दोन मुलं आहेत. एक अभिषेक बच्चन आणि दुसरी श्वेता बच्चन. अभिषेक बच्चन याने काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय हिच्या सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे. मात्र अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. आता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र, ही  गोष्ट खरी आहे. याबाद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. .

अमिताभ बच्चन यांना एक भाऊ देखील आहे. त्यांच्या भावाचं नाव अजिताभ बच्चन असं आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे मोठे कवी होते. अमिताभ बच्चन अनेक कार्यक्रमात आपल्या वडिलांच्या कविता देखील सादर करताना दिसत असतात.

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांना आराध्या नावाची गोंडस मुलगी देखील आहे. आराध्याची बॉलीवूडमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा वारंवार होताना दिसते. कारण की बच्चन घराण्यांमध्ये येणारी ती परी होती. अमिताभ बच्चन यांना श्वेता नंदा ही मुलगी असून तिचं देखील लग्न झालं आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून श्वेता अमिताभ यांच्या घरी राहत असल्याचं सांगण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी नयना हिने नुकताच एका बाळाला जन्म दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. तिला मुलगा झाला आहे. नैना ही कुणाल कपूरची बायको आहे. याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करत त्याने माहिती दिली आहे. नयना आणि मी आता आई-बाबा झालो आहोत. मला हे सांगताना खूप आनंद वाटत आहे. देवाचे आभार मानतो, असे कुणाल कपूर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही पोस्ट शेअर करताच त्याच्या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नयना हिला मुलगा झाल्याने बच्चन कुटुंबीय देखील आनंदाचं वातावरण आहे. अमिताभ आणि अजिताभ बच्चन हे आजोबा झाल्याने आनंद व्यक्त करत आहेत. कुणाल कपूरने 'रंग दे बसंती' या चित्रपटात जबरदस्त काम केलं होतं.