बॉडीगार्डला इतका पगार मोजतात अमिताभ बच्चन; आकडा वाचून बसेल धक्का 

अमिताभ बच्चन जिथे जातात तिथे त्यांचा बॉडीगार्ड जितेंद्र त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असतो. 

Updated: Aug 26, 2021, 09:36 PM IST
बॉडीगार्डला इतका पगार मोजतात अमिताभ बच्चन; आकडा वाचून बसेल धक्का  title=

मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची स्थिती या संपूर्ण इंडस्तट्रीत निःसंशयपणे सर्वोच्च आहे. प्रत्येक चित्रपट निर्माता आणि प्रत्येक कलाकार त्यांचा आदर करतात. अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोइंग कोटींमध्ये आहे. ते जिथे जातात तिथे असंख्य लोक फक्त त्यांची एक झलक पाहण्यासाठी जमा होतात. अशा परिस्थितीत तुम्ही समजू शकता की, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणं किती मोठं आव्हान असेल?

बिग बींसोबत सावलीसारखे 
बहुतेक फोटोंमध्ये जितेंद्र अमिताभ बच्चन यांच्या मागे किंवा जवळ उभे असल्याचं तुम्हाला दिसेल. पण इतकी मोठी जबाबदारी स्वीकारलेल्या जितेंद्र या कामासाठी किती मानधन घेत असेल? एका अहवालानुसार जितेंद्र सिंहची स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे पण ते स्वतः बीग बींचे संरक्षण करतात.

अमिताभच्या यांच्या बॉडीगार्डची फी
सार्वजनिक कार्यक्रमांपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटपर्यंत, अमिताभ बच्चन जिथे जातात तिथे जितेंद्र त्यांच्यासोबत जितेंद्र सावलीप्रमाणे असतो. अहवालानुसार, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा सांभाळण्यासाठी जितेंद्र वार्षिक 1.5 कोटी रुपये पगार घेतो. म्हणजेच, दरमहा त्याला सुमारे 12,50,000 / -रुपये पगार मिळतो.

अमिताभ यांच्या सांगण्यावरून करतो हे काम 
एवढा पगार अनेक कंपन्यांच्या सीईओंना देखील मिळत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध हॉलीवूड स्टार आणि फिल्ममेकर एलिजा वुड यांनाही जितेंद्र शिंदे यांनी त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सुरक्षा पुरवली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x