मुंबई : महानायक अमिताभ बच्चन कायमच वेगळे ठरले आहेत. त्यांच वेगळेपण हे अभिनयातून तर कधी कृतीतून पाहायला मिळालं आहे. आजही बिग बींनी शेतकऱ्यांसाठी जे काम केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अभिमान वाटत आहे. बळीराजाच्या डोक्यावरील ओझं कमी करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल
अमिताभ यांनी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी मदत केली आहे. बच्चन यांनी राज्यातील 1398 शेतकऱ्यांच 4.05 करोड रुपयांच कर्ज भरलं आहे. बच्चन यांनी ब्लॉगवर ही माहिती शेअर करताना लिहिलं आहे की, शेतकरी कायम संकटात दिसत आहेत. म्हणून त्यांच ओझं कमी करण्याची इच्छा होती.
बिग बी यांनी या अगोदर महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांच कर्ज भरलं आहे. आता उत्तर प्रदेशातील 1398 शेतकऱ्यांवर बँकाकडील असलेले कर्द 4.05 करोड रुपये कर्ज माफ करणार आहेत.
अमिताभ यांनी शेतकऱ्यांच हे कर्ज भरण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत 'ओटीएस : वन टाइम सेटलमेंट' केली आहे. 26 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची भेट घेऊन बँकेला पत्र पाठवणार आहेत. यासाठी त्यांनी 70 शेतकऱ्यांना मुंबईत आमंत्रित केलं आहे. तसेच त्यांच्यासाठी ट्र्रेनमध्ये पूर्ण डब्बा बुक केला आहे.