बिग बींना सेटवर केलं जातंय टॉर्चर; फोटो शेअर करत व्यक्त केली भावना

एवढ्या वर्षात पहिल्यांदाच बोलले बिग बी 

Updated: Dec 19, 2020, 01:22 PM IST
बिग बींना सेटवर केलं जातंय टॉर्चर; फोटो शेअर करत व्यक्त केली भावना

मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या एवढया वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कामाची तक्रार केली आहे. आपल्याला सेटवर टॉर्चर करत असल्याचं सांगत अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. याच माध्यमातून आज त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. 

तर झालं असं एका शूट दरम्यान बिग बी यांच्या एका हातात रसगुल्ला आणि गुलाबजाम पकडलं आहे. हे असं दोन हातात गोड पदार्थ धरणं म्हणजे एक प्रकारचं टॉर्चरचं आहे. एक पोस्ट टाकत अमिताभ बच्चन यांनी मनाची अवस्था शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या एका हातात गुलाबजाम दिसतोय तर दुसऱ्या हातात रसगुल्ला. 'जेव्हा गोड पदार्थ खाणं थांबवलं तेव्हा या शूटिंगवाल्यांनी माझ्या हातात गुलाबजाम आणि रसगुल्ला दिला. अन् म्हणतायेत या पदार्थांची चव सांगणारं एक्सप्रेशन द्या. आयुष्यात यापेक्षा मोठा टॉर्चर होऊच शकत नाही.' अशा आशयाची कॅप्शन देत अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतात. सतत आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतात. ज्येष्ठ कलाकारांमध्ये अमिताभ हे कायमच चाहत्यांशी संवाद साधत असतात.