OTT Releases : दमदार चित्रपटांची मेजवानी; पाहा 'हे' फूल ऑन अ‍ॅक्शन हिंदी चित्रपट

OTT Releases This Week: सध्या सुट्टीचा मोहोल सुरू झाला तेव्हा तुम्ही घरच्या घरी (OTT Films to Watch at Home) अथवा प्रवास करता करता मस्तपैंकी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. सध्या अशाच काही हटके चित्रपटांची रांग या आठवड्यात लागली आहे. तेव्हा जाणून घ्या तुमच्या (OTT Films to Watch While Traveling) आवडत्या कलाकारांचे कोणते चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर येणार आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 3, 2023, 05:34 PM IST
OTT Releases : दमदार चित्रपटांची मेजवानी; पाहा 'हे' फूल ऑन अ‍ॅक्शन हिंदी चित्रपट title=

OTT Releases This Week: सिनेमा चित्रपटगृहात पाहण्यापेक्षा अनेक जणं ते ओटीटीवर (OTT Releases) पाहण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे अनेकांना घरच्या घरीच असे चित्रपट हे पाहता येतात. आता प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट कधी प्रदर्शित होतो आहे त्यापेक्षा तो ओटीटीवर कधी येतो आहे याची वाट पाहतात. तेव्हा या वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदांची बातमी आहे. लवकरच तुमच्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. सध्या सुट्ट्यांचा माहोल (Weekend) सुरू झाला आहे, आपल्यासाठी चित्रपट पाहण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

अनेक जणं हे ट्रॅव्हलिंगही करत असतील तेव्हा वाटेत रस्त्यात प्रवास करता करता तुम्ही काही हटके चित्रपट पाहू शकता. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांवर एक नजर टाकूया. यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई केली आहे. आता ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाले आहेत. त्यातून आता काही नवीन हिंदी चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांसाठी चित्रपटांची चांगली मेजवानी पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर का हे चित्रपट चित्रपटगृहात पाहिले असतील तर आता तुम्हाला हे चित्रपट पुन्हा एकदा ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. (OTT Releases This Week saas bahu aur flamingo vikram vedha tu jhoothi main makkaar hindi films)

  • रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची पेअर असलेल्या 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झाला आहे. 3 मे ला म्हणजे आज हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. हा चित्रपट फुल ऑन फॅमिली ड्रामा आहे त्याचसोबतच तुम्हाला कॉमेडी, रोमान्स, उत्कृष्ट अभिनय आणि डान्स एन्जॉय करायला मिळेल. 

  • 'सास, बहू और फ्लेमिंगो' ही डिंपल कपाडियाची वेबसिरिज ओटीटीवर येते आहे. 5 मे रोजी 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर ही वेब सिरिज प्रदर्शित होते आहे. या सिरिजमध्ये राधिका मदन, डिंपल कपाडिया, अंगिरा धर, ईशा तलवार यांच्या प्रमुख भुमिका आहेत. यातून तुम्हाला काहीतरी हटके पाहायला मिळेल. या सिरिजचे दिग्दर्शन होमी अदाजानिया यांनी केले आहे.  

हेही वाचा  - Met Gala 2023: 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर 'या' सुपरमॉडेलच्या साडीनं आलियालाही टाकलं मागे

  • 'क्विन शार्लेट - ब्रिजरटन स्टोरी' ही वेबसिरिजही 'नेटफ्लिक्स'वर उद्या म्हणजे 4 मेला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये राजघरण्यातील कथा दाखवण्यात आली असून या सिरिजचे दिग्दर्शन हे टॉम वेरिका यांनी केले आहे. 

  • सैफ अली खान आणि हृतिक रोशनचा गाजलेला सिनेमा 'विक्रम वेधा' हा 'जिओ सिनेमा'वर 8 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटातून तुम्हाला जबरदस्त एक्शन पाहायला मिळणार आहे. 

त्यामुळे हे चित्रपट आणि वेबसिरिज या विकेंडला पाहायला विसरू नका.