अमृता खानविलकरची 'अमृत कला'; तुम्हीही थिरकाल तिच्या तालावर

पाहा अमृताची कथक कला 

Updated: Jun 27, 2021, 02:26 PM IST
अमृता खानविलकरची 'अमृत कला'; तुम्हीही थिरकाल तिच्या तालावर  title=

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकरने नवा उपक्रम सुरू केलाय. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेले काही दिवस ती या उपक्रमाचं प्रमोशन करत होती. अखेर अमृत कला नावाने तिने आपल्या नृत्याचा व्हिडिओ शेअर केला...आणि अमृत कला सिरिजचा पहिला व्हिडिओ म्हणून तिने कॅप्शन दिलंय...कोरिओग्राफर आशिष पटीलसोबत अमृताने नटरंगच्या गाण्यावर मनमोहक असं नृत्य सादर केलं...प्रत्येक रविवारी अमृत कलाचा नवा व्हिडिओ आपल्या समोर येणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमृताने तिच्या पहिल्या भागात कथक नृत्याचं सादरीकरण केलं आहे. सध्या या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृताची ही कला पाहून सोशल मीडियावर तिच्या नृत्याचं कौतुक होत आहे. आता चाहते तिच्या पुढच्या व्हिडिओच्या प्रतिक्षेत आहेत.