Ananya Panday च्या सुंदर व्हिडिओचा नजराणा, पोस्ट केला Underwater VIDEO

अनन्या पाण्यात एखाद्या जलपरीसारखी दिसत आहे. O

Updated: Sep 22, 2021, 02:26 PM IST
Ananya Panday च्या सुंदर व्हिडिओचा नजराणा, पोस्ट केला Underwater VIDEO

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपल स्थान पक्क केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ट्रोलर्सची संख्या देखील फार मोठी असते. अनन्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असते. शिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अनन्या सतत सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. 

 आता देखील तिने Underwater स्विमिंग करताना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनन्या पाण्यात एखाद्या जलपरीसारखी दिसत आहे. Underwater स्विमिंग व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'हिरव्या समुद्रात कासवासोबत स्विमिंग.. माझ्या जीवनातील सर्वात मोठा आणि चांगला अनुभव... ' असं लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या अनन्याचा हा Underwater स्विमिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनन्याबद्दल खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या अभिनेता इशान खट्टरला डेट करत आहे. 'खाली पीली' चित्रपटात त्यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. 'स्टूडंट ऑफ द इअर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. 

अनन्या्च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने अभिनेत्री तारा सुतारिया अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासोबत  'स्टूडेंट ऑफ द ईयर 2'  चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता अनन्या  तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे.