Nagarjuna Father Attempted Suicide : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या ते चर्चेत असण्याचं कारण त्यांची इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये असलेली हजेरी आहे. यावेळी नागार्जुन यांनी त्यांचे वडील ANR यांच्याविषयी सांगितलं आहे. त्यांनी दावा केला की त्यांचे वडील एएनआर यांनी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या स्त्री सारख्या स्वभावाला पाहून सगळे त्यांची खिल्ली उडवायचे.
'फ्री प्रेस जर्नल' प्रमाणे नागार्जुन यांनी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये सांगितलं की 'त्यांचे वडील अगदी सर्वसामान्य कुटुंबातून येतात. त्यांचं कुटुंब हे शेतकरी कुटुंबातून येतं. त्यांच्या गावात लाईट सुद्धा नव्हती. माझ्या आजीची इच्छा होती की त्यांची मुलगी असायला हवी, पण तिथे कोणती मुलगी नव्हती. तर ती मला मुलींचे कपडे परिधान करायची. मला वाटायचं की हेच ते कारण आहे ज्यामुळे ते अभिनेता झाले. आजी त्यांना मुलींचे कपडे परिधान करायची, त्यांची वेणी घालायची आणि या लूकमध्ये माझे बाबा खूप सुंदर दिसायचे. त्याकाळात महिलांना अभिनय करण्याची किंवा स्टेजवर येण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांनी महिलांची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा अभियन केला तेव्हा त्यांचं वय काही तरी 15 वर्ष होतं. माझ्याकडे आजही त्यांची मुलींच्या वेषातील फोटो आहेत. त्यात ते हुबेहुबे माझी मोठी बहीण सत्या सारखे दिसतात.'
पुढे वडिलांना अभिनयाची संधी कशी मिळाली याविषयी सांगत नागार्जुन म्हणाले, 'ते एकदा एका रेल्वे स्टेशनवर होते, तेव्हा ट्रेनमध्ये लोकप्रिय निर्माता घंटासला बलरामय्या यांनी त्यांना पाहिलं आणि म्हणाले की तुमचे डोळे मस्त आहेत, नाकही चांगलं आहे... तुम्हाला अभिनय करायला आवडले? त्यानंतर काय झालं हे सगळ्यांना माहित आहे.'
नागार्जुन त्यांच्या वडिलांची कशी खिल्ली उडवली जायची याविषयी सांगत म्हणाले, 'त्यांची सतत खिल्ली उडवली जायची आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नागार्जुन म्हणाले, 'लोकांनी त्यांची खिल्ली उडवली आणि त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटू लागलं होतं. ते एक दिवस मरीना बीचवर गेले आणि त्यांनी म्हटलं की त्यांना स्वत: ला संपवायचं आहे कारण त्यांची खूप खिल्ली उडवतात.'
हेही वाचा : 'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नबंधनात, कोण आहे त्याची बायको?
नागार्जुन यांनी पुढे सांगितलं की 'वडिलांनी मला सांगितलं की समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर कंबरेएवढ्या पाण्यापर्यंत ते पोहोचले आणि मग पुढे जाणार तितक्यात त्यांच्या आतून त्यांना असं काही करण्यापासून थांबवलं आणि तेव्हा त्यांनी स्वत:ला सावरलं आणि तिथून बाहेर आले.'