अनन्या पांडेच्या आईचा सुपरहॉट Look, फोटो पाहून म्हणाल अनन्यापेक्षाही सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आजकाल ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. 

Updated: Oct 23, 2021, 06:01 PM IST
अनन्या पांडेच्या आईचा सुपरहॉट Look, फोटो पाहून म्हणाल अनन्यापेक्षाही सुंदर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आजकाल ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून एनसीबी तिची कसून चौकशी करत असून येत्या सोमवारी तिची पुन्हा चौकशी होणार आहे. अनन्या पांडे तिच्या लुक आणि फॅशनसेन्समुळे कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते.
 
पण तुम्हाला माहित आहे का की, अनन्याला हे सौंदर्य तिची आई भावना पांडेकडून मिळालं आहे. भावना देखील तिच्या काळात खूप बोल्ड होती, तिला तिच्या बोल्ड अदांसाठी तिची प्रशंसा केली जाते. अनन्या पांडेची आई भावना पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे फोटो शेअर करते. या फोटत ती अतिशय बोल्ड शैलीत बीचवर उभी आहे आणि जांभळ्या रंगाची ब्रलेट घातलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती रस्त्यावर स्पोर्ट्स ब्रामध्ये उभी असल्याचं दिसतंय.

फोटो पाहता हे फोटो भारतातले नाही असं वाटतंय. बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची पत्नी भावना पांडेने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए केलं आहे. भावना चित्रपटांपासून लांब राहिली तरीही. पण गेल्या वर्षी ती 'बॉलीवुड वाइव्स' या सिरीजमध्ये दिसली. भावना पांडे मलायका अरोराची चांगली मैत्रीण आहे, ती गौरी खान आणि सीमा खानची जवळची मैत्रीण देखील आहे.