महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट! फेब्रुवारीत संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार? 16 तासांचा प्रवास फक्त 6 तासांत

Samruddhi Mahamarg :  फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे आता थेट मुंबईतून समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरु होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 3, 2025, 03:52 PM IST
 महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट! फेब्रुवारीत संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार? 16 तासांचा प्रवास फक्त 6 तासांत title=

Samruddhi Expressway Update:  महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता  16 तासांऐवजी फक्त 8 तासांत पार करता येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या महामार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा... महाराष्ट्राची देवभूमी! दोन्ही बाजूला पाण्याने पाण्याने वेढलेले कोकणातील चमत्कारिक मंदिर कधीच संकटात सापडत नाही

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग  हा 701 किलोमीटर लांबाची आहे.  सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंत 625 किलोमीटरच्या महामार्गावरुन वाहतूक सुरु आहे. इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटच्या टप्प्याचे काम सुरु होते. आता या टप्प्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. 

समृद्धी महामार्ग प्रकल्प पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे. सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार विजेते सिव्हिल इंजिनियर डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड हे या ड्रीम प्रोजेक्टचे शिल्पकार आहेत.  डॉ. गायकवाड यांनी MSRDC चे मुख्य अभियंता म्हणून समृद्धी महामार्गाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

समृद्धी महामार्गा हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे. या महामार्गावरुन ताशी 150 किमी प्रतितास वेगाने वाहने धावतात. समृद्धी महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत. इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.
इतकचं नव्हे तर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी 80 हून अधिक संरचना उभारण्यात आल्या आहेत. महामार्गाजवळ 18 नवीन स्मार्ट टाऊन्स उभारले जाणार आहेत, जिथे स्थानिक वैशिष्ट्यांवर आधारित उद्योगांची स्थापना केली जाणार आहे.  67,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या महामार्गामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांना थेट आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्ष कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. यामुळे प्रचंड सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.