अनिल कपूर यांची लव्ह स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायक, पैसे नव्हते म्हणून....

अनिल कपूर यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या सुनिता कपूर... 

Updated: May 20, 2021, 08:18 PM IST
अनिल कपूर यांची लव्ह स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायक, पैसे नव्हते म्हणून.... title=

मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत ज्या लोकांसाठी एक उदाहरण आहेत. अनिल कपूरने जेव्हा सुनिता कपूरला पहिल्यांदा पाहिले तेव्हा असेच काहीसे घडले. सुनिताला पहिल्यांदा पाहून अनिल कपूर देखील तिच्या प्रेमात पडले. पण लग्न तर सोडा कनिल कपूर यांना सुनिता यांच्यापर्यंत पोहोचणं देखील कठीण होतं.

आज या दोघांच्या लग्नाला 37 वर्ष झाले आहेत पण आजही त्यांचे एकमेकांवरील प्रेम कमी झालेले नाही. अनिल आणि सुनिता यांच्या लग्नाच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत.

अनिल कपूरने लग्नाआधी बर्‍याच मुलींना डेट केले होते. अर्जुन कपूरला मुलाखत देताना अनिलने सांगितले होते की, शाळेच्या दिवसांपासून तो मजेशीर जीवन जगत आहे. त्यांना अभ्यास करायला आवडत नाही, म्हणून ते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसायचे. त्यानंतर त्यांनी 3-4 मुलींना डेट केले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये 20-25 मुली त्यांच्या मैत्रिणी झाल्या, परंतु सुनीता सर्वोत्कृष्ट होती. मग आमच्या दोघांचे लग्न झाले.

सुनिता यांची पहिली भेट?

2018 मध्ये ह्यूम्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर यांनी आपल्या प्रेमकथेविषयी अनेक खुलासे केले. अनिल कपूर यांनी सुनिता कपूर यांना पहिल्यांदा कसे भेटले ते सांगितले होते आणि मग प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. सुनिताचा नंबर अभिनेताला त्याच्या एका मित्राने  कॉलसाठी दिला होता, पण जेव्हा अनिल कपूर सुनिताशी बोलले तेव्हा ते त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते एका पार्टीत भेटले आणि अनिलला पहिल्या दृष्टीक्षेपात सुनिता आवडल्या. मग दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि दोघे मित्र बनले. यापूर्वी अनिल सुनिताशी आवडलेल्या दुसर्‍या मुलीबद्दल बोलते होते. पण त्यानंतर त्या मुलीने अनिल कपूर यांना सोडले आणि यानंतर सुनिता आणि अभिनेता अनिल कपूर एकत्र आले.

सुनिता करायच्या खर्च

आज अनिल कपूर कोट्यावधींचे मालक असले तरी एक काळ असा होता जेव्हा अनिल कपूर यांच्याकडे टॅक्सी भाड्याला देखील पैसे नव्हते. सुनिता त्यांचा खर्च उचलत असे. अनिल कूपरकडे कोणतेही काम नव्हते.

एक दिवसात लग्न ...

अनिल कपूर यांनी खूप संघर्ष केला आणि सुनिताने त्यांना सपोर्ट केला. त्यानंतर 1985 मध्ये जेव्हा अनिल कपूर यांना 'मेरी जंग' मधून मोठा ब्रेक मिळाला तेव्हा त्यांनी सुनिताला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 17 मे 1984 रोजी चित्रपट साइन केला, 18 मेला प्रपोज केलं आणि 19 मे रोजी दोघांनी लग्न केले. अनिल कपूर यांनी सुनिताला याआधी कधीही प्रपोज केलं नव्हतं. कारण सुनिताने स्वयंपाकघरातील कामे करायला आवडत नव्हते. पण जेव्हा अनिल कपूरला 'मेरी जंग' सिनेमा मिळाला तेव्हा त्यांना वाटले की आता ते घरात कामासाठी व्यक्ती ठेवू शकतात. त्यामुळे त्यानंतर त्यांनी सुनिता यांना प्रपोज केलं. लग्न करायचे तर दुसऱ्याच दिवशी नाही तर नाही. असं सुनिता यांनी म्हटलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिक कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकदा आपल्या प्रेमकथेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूर यांनी सुनितासाठी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.