अनिल कपूरचा मुलगा या अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट

बॉलिवूडमध्ये नेहमी स्टारकिड्सबाबत चर्चा असते. आता अनिल कपूर यांचा मुलगा सध्या चर्चेत आलाय. मिर्जया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन कपूर सध्या एका अभिनेत्रीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. हर्षवर्धन कपूरला मुंबईतील एका रेस्टोरेंटमधून बाहेर निघतांना पाहिलं गेलं. 

shailesh musale Updated: Apr 3, 2018, 05:15 PM IST
अनिल कपूरचा मुलगा या अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट

मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमी स्टारकिड्सबाबत चर्चा असते. आता अनिल कपूर यांचा मुलगा सध्या चर्चेत आलाय. मिर्जया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन कपूर सध्या एका अभिनेत्रीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. हर्षवर्धन कपूरला मुंबईतील एका रेस्टोरेंटमधून बाहेर निघतांना पाहिलं गेलं. 

कोण आहे ती अभिनेत्री

हर्षवर्धन एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही अभिनेत्री अजून कोणी नाही तर अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलिया आहे. आलिया सोबत हर्षवर्धन डिनर डेटवर पाहिला गेला. या दरम्यान दोघेही कॅजुअल लुकमध्ये दिसले. हर्षवर्धन हा टीशर्टसह कूल लूकमध्ये दिसला. आलिया देखील खूपच कंफर्टेबल अंदाजमध्ये दिसली. आलिया रिफ्ड जीन्स आणि शर्टमध्ये दिसली.

Media preview

याआधी ही करत होता डेट

रेस्टोरेंटमधून निघाल्यानंतर आलिया सरळ आपल्या कारमध्ये जाऊन बसली. आलियाला हर्षवर्धन डेट करतो आहे का अशी चर्चा आता बॉलिवूडमध्ये आहे. याआधी हर्षवर्धन सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानला डेट करत होता. रिहा चक्रवर्तीसोबत देखील हर्षवर्धनचं नाव जोडलं गेलं होतं. हर्षवर्धन लवकरच अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये आपल्या वडिलांसोबत काम करणार आहे.