रिअॅलिटी शोमध्ये अंकिता- विकीच्या नात्यात दुरावा! चारचौघात पाहा एकमेकांशी कसं वागतायत

Bigg Boss 17 Ankita Lokhande and Vicky Jain : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात त्या दोघांमध्ये दुरावा येतोय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 18, 2023, 11:38 AM IST
रिअॅलिटी शोमध्ये अंकिता- विकीच्या नात्यात दुरावा! चारचौघात पाहा एकमेकांशी कसं वागतायत
(Photo Credit : Social Media)

Bigg Boss 17 Ankita Lokhande and Vicky Jain : 'बिग बॉस'चं 17 वं पर्व सुरु झालं आहे. बिग बॉस हे असं एक ठिकाण आहे जिथे घराच्या बाहेर असलेली चांगली नाती देखील बिघडतात. काही लोक जे आधी एक-मेकांचे शत्रू असतात ते मित्र होतोत. जे मित्र किंवा कपल असतात ते दुरावतात. यंदाच्या सीझनमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे आणि विकी जैन आहे. विवाहीत असलेल्या या जोडप्याची बिग बॉसच्या घरात परीक्षा सुरु आहे. या पर्वाची सुरुवात होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत आणि इतक्यात त्या दोघांमध्ये सतत काही ना काही वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  आता अंकिता ही विकीवर इतकी रागावली आहे की त्याविषयी ती सगळ्यांसमोर बोलताना दिसली आहे. इतकंच नाही तर तिनं खळबळ जनक वक्तव्य केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अंकिताला एकटीला सोडतो विकी जैन 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अंकिताचा ईशासोबत विकीविषयी बोलताना दिसली की 'मला कोणासमोर काहीचं बोलायचं नाही. तो असाच आहे, त्याचा स्वभावच तसा आहे. कोणी नवीन व्यक्ती आली की त्या व्यक्तीसोबत हाहा-हीही करतो आणि मला एकटीला सोडतो. मी हा शो करायला आले नाही. मला घरी परत जायचंय. याला खेळवा, याला गेम खेळायचा आहे. हा या खेळासाठी योग्य आहे, पण मी अशी नाही आहे.'

हेही वाचा : लग्नातील साडीच पुन्हा का नेसली? राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या आलियानं दिलेलं कारण तुम्हालाही आवडेल

ईशा यावर बोलते की विकी म्हणाला की 'अंकितासाठी जो क्षण 17 वर्षांपूर्वी आला होता तो क्षण माझ्यासाठी आता आला आहे. 'तर अंकिता म्हणते की 'मी अजून माझ्या लोकांना अजून मागे सोडलं नाही. मी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाते, एकेकालासोबत घेऊन जाते. जर विकी आज इथे आहे. तर मी त्याला देखीलसोबत घेऊन आली आहे. मी कधीच त्याला दुय्यम स्थान दिले नाही. तो 17 वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय, पण तो आधीपासूनच असा आहे. नेहमीच असं करतो.' 

अंकिताला आहे ही तक्रार 

अंकिता पुढे म्हणते की 'तो सगळं करतो, पण जेव्हा इतके लोक येतात तेव्हा तो मला विसरून जातो. घरीपण जेव्हा खूप लोक येतात तेव्हा तो मला विसरून जातो. माझं असं असतं की मला येऊन त्यानं विचारावं की माझा बेबी काय करतोय?'

About the Author