अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नंट; दिसली बेबीबंप लपवताना?

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Oct 16, 2022, 10:39 PM IST
अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नंट; दिसली बेबीबंप लपवताना?  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. अंकिताने तिचा पती विकी जैनसोबतचे रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत आणि अलीकडेच तिच्या अशाच एका रोमँटिक फोटोने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. हा फोटो पाहिल्यापासूनच चाहत्यांचा अंदाज आहे की, अंकिता प्रेग्नंट आहे आणि तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. अंकिताचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खरंतर, अंकिता लोखंडेने तिचा  पती विकी जैनसोबत पार्टीतले फोटो काहिदिवसांपूर्वी शेअर केले होते. यामध्ये ती ब्लू कलरच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचवेळी विकी अंकिताच्या पोटावर हात ठेवून पोज देत आहे. तिने हे फोटो केवळ तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यासाठी क्लिक केल्याचं म्हटलं जात आहे. अंकिताने या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, 'मी तुझ्यावर तु जसा आहेस तसं आणि जसा असशील तसं प्रेम करते आणि करत रहाणार.'

अंकिता लोखंडेच्या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करत आहेत. काही जण तिच्या लूकचं कौतुक करत आहेत तर काही जण तिला प्रेग्नंट असण्याबद्दल विचारत आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं आहे की, 'आर यू प्रेग्नंट अंकिता?', त्यामुळे अनेक जण तिचे अभिनंदन करत आहेत. या फोटोत अंकिताच्या पोटावर विकीचा हात असल्याने चाहते असा अंदाज बांधत आहेत. मात्र, दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन डिसेंबर २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. त्याच वेळी, काही काळापूर्वी दोघंही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. ज्यांच्या फोटोंचा सोशल मीडियावरही बोलबाला होता.