पवित्र रिश्ता 2 : अंकिता दिसणार अर्चनाच्या भूमिकेत?, मानवची भूमिका मात्र....

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका 'पवित्र रिश्ता' मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल. 

Updated: May 12, 2021, 02:06 PM IST
पवित्र रिश्ता 2 : अंकिता दिसणार अर्चनाच्या भूमिकेत?, मानवची भूमिका मात्र....

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका 'पवित्र रिश्ता' मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल. मालिकेमुळे अभिनेता सुशातं सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेला बरीच लोकप्रियता मिळाली होत. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. शिवाय आजही ही मालिका प्रेक्षक विसरू शकलेला नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर मालिकेच्या सिक्वलची जोरदार चर्चा रंगली आहे. पण आता मालिकेचे निर्माते 'पवित्र रिश्ता 2' च्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना 'पवित्र रिश्ता 2'  मालिका पाहाता येणार आहे. 

सांगायचं झालं तर  'पवित्र रिश्ता 2'  ही मालिका प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहे.  'पवित्र रिश्ता 2' मध्ये अर्चनाच्या भूमिकेत अंकिता लोखंडेचं दिसणार आहे. तर मानवचा भूमिका कोण साकारेल हे अद्याप कळू शकलेलं नाही. मानवच्या भूमिकेसाठी निर्माते नव्या अभिनेत्याच्या शोधात आहे. 

मालिकेत मानवच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच अकिंता लोखंडे हीने ‘पवित्र रिश्ता २’ साठी शो साईन केला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, 'जमाई राजा' आणि 'कुबूल है' या मालिकांचे सिक्वल देखील डिजिटल विश्वाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.