प्रिया प्रकाशने आपल्या मधुर आवाजात चाहत्यांना केलं घायाळ

प्रिया तिच्या संगीत कौशल्यामुळे चर्चेत आली आहे.  

Updated: Sep 25, 2020, 07:36 PM IST
प्रिया प्रकाशने आपल्या मधुर आवाजात चाहत्यांना केलं घायाळ

मुंबई : सध्या अभिनेत्री प्रिया प्रकाश तिच्या नजरेच्या इशाऱ्याने नाही तर मधुर आवाजाने चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. आता प्रिया तिच्या संगीत कौशल्यामुळे चर्चेत आली आहे. प्रियाने यूट्यूबवर स्वतःचं चॅनल सुरू केलं आहे. तिने या चॅनलला प्रिया असं नाव दिलं आहे. सुरवातीला तिने अभिनेत्री उर्मिला मांतोडकर स्टारर 'रंगीला' चित्रपटातील 'हाय राम ये क्या हुआ' हे गाणं प्रियाने गायलं होतं. प्रियाने गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं प्रसिद्ध झालं होतं. 

त्यानंतर आता पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने चाहत्यांची फर्माईश पूर्ण करत अनेक गणी गायली आहेत. आपर्यंत तिच्या मधुर आवाजाचा आनंद ५६ हजार पेक्षा जास्त रसिकांनी घेतला आहे. 

सध्या सोशल मीडियावर तिचा आवाज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांनी देखील तिच्या या कौशल्याचे कौतुक केलं आहे. दरम्यान प्रियाला तिच्या नजरेच्या अदाकारीमुळे रातोरात स्टार केलं होतं. 

त्यानंतर ती यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. 'ओरू अदार लव' चित्रपटातील भूमिकेमुळे तिची लोकप्रियता वाढली. प्रिया आता लवकरच 'श्रीदेवी बंग्लो', 'लव हॅकर्स' चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.