#MeToo: अनु मलिक यांच्यावर आणखी 2 महिलांचे धक्कादायक आरोप

अनु मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप

Updated: Oct 20, 2018, 04:15 PM IST
#MeToo: अनु मलिक यांच्यावर आणखी 2 महिलांचे धक्कादायक आरोप title=

मुंबई : गायिका सोना मोहापात्रा आणि श्‍वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्‍यूजिक डायरेक्‍टर अनु मलिकवर यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. या दोन्ही महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आपली ओळख दाखवत धमकावल्याचा देखील आरोप केला आहे. सोना मोहापात्राच्या आरोपानंतर अनु मलिक यांनी तिला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. तर श्वेत पंडितचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

मिड-डेने या दोन्ही महिलांची ओळख जाहीर न करत त्यांचं म्हणणं समोर ठेवलं आहे. गायनात आपलं करिअर बनवण्याच्या आशेने ही महिला या क्षेत्रात आली. मेहबूबा स्‍टूडिओमध्ये अनु मलिक यांच्याशी भेट झाली. या दरम्यान मलिक यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि त्यानंतर माफी मागितली. पण नंतर एका इवेंटसाठी फंड जमा करण्याच्या दरम्यान त्यांची भेट झाली होती. नंतर ती एका सहकाऱ्यासोबत मलिक यांच्या घरी भेटण्यासाठी गेली, तिथे त्यांनी पत्नी आणि मुलीची ओळख करुन दिली. काही दिवसानंतर पुन्हा याच कामासाठी तिला घरी बोलवलं. पण तेव्हा अनु मलिक घरी ऐकटेच होते.

अनु मलिकांकडून जबरदस्तीचा प्रयत्न

पीडितेने म्हटलं की, 'जेव्हा ती त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा दोघांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर अनु मलिक सोफ्यावर तिच्या बाजुला येऊन बसले. मला वाटलं की, मी आता फसली आहे. कारण तेव्हा घरी कोणीच नव्हतं. त्यानंतर त्यांनी माझा स्कर्टवर केला आणि स्वत:ची पँट काढली. मी त्यांना लांब करण्याचा प्रय़त्न करत राहिले पण ते माझ्यावर भारी पडले. तेव्हा अचानक दरवाज्याची बेल वाजली आणि ते चिडून उठले. मी लगेचच तेथून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मलिक यांनी तिला ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.'

अनु मलिक नंतर तिला सोडण्यासाठी कारमध्ये घेऊन आले. कोणीही नव्हतं अशा ठिकाणी त्यांनी गाडी उभी केला आणि यौन शोषणाचा प्रयत्न केला. रात्रीचे 8.30 वाजले होते आणि गाडी एका सुनसान जागेवर होती. पण तेव्हा एका वॉचमॅनने गाडीची काच ठोकली आणि मी तेथून पळून गेली. अनुक मलिक पँटची चैन उघडण्य़ाचा प्रयत्न करत होते.'

दुसऱ्या महिलेचा आरोप

दूसऱ्या महिलेने असा आरोप केला की, 'मलिक यांनी म्हटलं की पुढच्यावेळी भेटण्यासाठी येशील तेव्हा शिफॉन साडी घालून ये. तुझ्याकडे बॉयफ्रेंड नाही तर तुला एकटं वाटत असेल. जेव्हा मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला जोरात ओढलं आणि गळ्यात पडले. मी खूप घाबरली होती. कारण ते एका साउंडप्रूफ रिकॉर्डिंग स्टूडियोमध्ये होते. मी त्यांना धक्का दिला आणि म्हटलं की, तुम्हाला माहितीये तुम्ही काय करताय. त्यावर मलिकने म्हटलं की, मी माझ्या पत्नीसोबत खूप खूश आहे. मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. मला इंडियन आयडल 10 मध्ये वाइल्‍ड कार्ड एंट्रीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण अनु मलिकमुळे तिला ते सोडावं लागलं.'