मुलीचा बॉयफ्रेंडसोबत 'तो' फोटो शेअर करत दिग्दर्शक म्हणाला...

या फोटोत आलिया आणि शेन एकत्र दिसत आहेत. 

Updated: Feb 25, 2022, 02:55 PM IST
मुलीचा बॉयफ्रेंडसोबत 'तो' फोटो शेअर करत दिग्दर्शक म्हणाला... title=

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकताच आपली मुलगी आलिया कश्यप आणि तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरे एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत आलिया आणि शेन एकत्र दिसत आहेत. खरंतर शेन पूर्ण एक महिन्यासाठी बाहेर जात आहे.  आणि म्हणूनच आलिया आणि अनुरागने मिळून त्याला बाय-बाय डिनर दिलं आहे. 

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अनुराग आपली मुलगी आलियाला चिडवताना लिहीलं आहे की, हे एक बाय-बाय डिनर आहे. उद्या सकाळी पुर्ण एक महिन्यासाठी शेन बाहेर जाणार आहे. आणि आलिया यासाठी खूप दु:खी आहे. 

अनुरागच्या या पोस्टवर शिवानी रधुवंशी आणि टिस्का चोपडाने देखील रिएक्ट करत हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. एवढंच नाहीतर. शेन ग्रेगोइरे आणि आलिया कश्यपचा हा फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स देखील भरपूर कमेंन्ट करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्टनुसार, शेन आणि आलिया गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रिपोर्टनुसार दोघांची पहिली भेट डेटिंग अॅपवरुन झाली होती. शेन एक अमेरिकी एंटरप्रेन्योर आणि रिसर्चर आहे.