Beed Updates: धनंजय मुंडेंना तब्बल 50 हजारांची लीड, विजय निश्चित

Beed Updates: बीडमधील परळीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजसाहेब देशमुख यांच्यात सामना आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 23, 2024, 12:23 PM IST
Beed Updates: धनंजय मुंडेंना तब्बल 50 हजारांची लीड, विजय निश्चित title=

Beed Updates: महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यामध्ये बीडमधील परळी मतदारसंघदेखील आहे. याचं कारण बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. परळीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजसाहेब देशमुख यांच्यात सामना आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे दुसऱ्या फेरी अखेर 4300 मतांनी आघाडीवर आहेत. 

Updates: 

बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे 50531आघाडीवर
लीडचा पन्नास हजाराचा आकडा पार... धनंजय मुंडे यांची निर्णायक आघाडी

महायुतीचे सर्व नेते, माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि असंख्य लाखो जीवाचे सहाकारी यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली. आता पहिल्या 16 फेरींचा निकाल पाहिल्यानंतर ही निवडणूक फक्त जीवलग सहकाऱ्यांनीच हाती घेतली नव्हती. तर या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील जनतेनेच हाती घेतली होती अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  

जात-पात धर्म याच्यावर मागील काळात जी निवडणूक झाली, ती यावेळी राजकारण न करता विकास, कर्तृत्वाच्या पाठीशी माय-बाप जनता उभी राहिली. मी त्यांचे शेवटच्या श्वासापर्यत ऋणी राहीन असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

2019 मध्ये मुंडे भावा-बहिणीत झाली होती लढत

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा 30 हजार 701 मतांनी पराभव झाला होता. 

धनंजय मुंडे मागील 22 वर्षांपासून परळीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते कृषी मंत्रीपदापर्यंत त्यांनी काम केलं आहे. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. ओबीसी समाजाचाही त्यांना पाठिंबा आबे. त्यातच यावेळी त्यांना पंकजा मुंडेंचीही साथ मिळाली आहे. पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या.