कसा साजरा होतोय विरुष्काच्या लेकिचा पहिला Birthday ? Video Viral

नकळतच तुमच्याही चेहऱ्यावर हसू खुलेल...   

Updated: Jan 11, 2022, 05:06 PM IST
कसा साजरा होतोय विरुष्काच्या लेकिचा पहिला Birthday ? Video Viral  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचं वैवाहिक नातं 11 जानेवारी 2021 ला पूर्णपणे बदललं. कारण होतं, त्यांच्या मुलीचा जन्म. दोघांच्या या नात्याला आता खऱ्या अर्थानं आकार देत या स्टार कपलच्या लेकीचा जन्म झाला. (Anushka sharma Virat Kohli)

वामिका असं अनुष्का आणि विराटच्या मुलीचं नाव. आजपर्यंत तिचा चेहरा काही खास व्यक्ती वगळता फार कोणी पाहिला नाही. 

कारण, खुद्द अनुष्का आणि विराटनं तिचा एकही फोटो पोस्ट केला नाही आणि कौतुक म्हणजे त्यांनी तो व्हायरलही होऊ दिला नाही. 

अशी ही विरुष्काची लाडाची लेक आता एका वर्षाची झाली आहे. कोणाही आई- वडिलांसाठी आपल्या बाळाचा वाढदिवस म्हणजे कौतुकाचीच बाब. 

त्यातही पहिला वाढदिवस म्हणजे उत्साहात भर. अनुष्का आणि विराट सध्या याच आनंदाचा अनुभव घेत आहेत. 

लेकिच्या वाढदिवसासाठी या जोडीनं खास प्लॅनिंग केलं असणार यात शंका नाही. किंबहुना आता ते या सेलिब्रेशनचे फोटो कधी एकदा पोस्ट करतात याचीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

दरम्यान, वामिकाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या तोंडून उच्चारले जाणारे गोड शब्द सर्वांच्याच कानावर पडत आहेत. 

हा व्हिडीओ अनुष्कानं 2021 च्या शेवट्या दिवशी अर्थात 31 डिसेंबरला सायंकाशी तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता. 

व्हिडीओमध्ये समोरचं निरभ्र आकाश, रममाण करणारं वातावरण सारंकाही दिसत आहे. तर, मध्येच वामिकाचा आवाजही येत आहे.

'म..म्ममम्म...मम्मा' असं ती इथं म्हणताना कानावर पडत आहे. हे गोड शब्द ऐकून आपल्याच चेहऱ्यावर स्मित येत आहे तर प्रत्यक्षात ते क्षण अनुभवताना अनुष्काला कसं वाटलं असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.