मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर काल दिल्लीमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ते क्रीडा, सिने जगतातील अनेक दिग्गाजांनी विरूष्काच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
विरूष्काच्या लग्नानंतर त्यांच्या रिसेप्शनचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण कोहलीच्या एका चाहत्याने 'विरूष्का'वर गाणं केलं आहे. हे नवं गाणं त्यांच्या स्तुतीसाठी नव्हे तर चक्क अनुष्कामुळे टीम इंडियाचं नुकसान झाल्याच्या आशयाचे आहे.
'कोहली भईले भातार... ' या गाण्याला 4,000,604 व्ह्युज मिळाले आहेत. तसेच 11K लाईक्स आणि
3K डिसलाईक्स मिळाले आहेत. सुरज संजय या गायकाने हे भोजपुरी गाणं गायलं आहे.
लोकांनी युट्युबवर या गाण्याच्या खाली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या अपयशाला अनुष्काचे मैदानात हजर राहणे हे एक कारण असल्याचे काही चाहत्यांनी म्हटले होते. त्यावेळेसही पुरूषप्रधान संस्कृती आणि कोत्या मानसिकतेवर टीका करण्यात आली होती.