भावाप्रती अपारशक्तीची 'ही' कृती पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेत्यांचा खास आदर्श 

Updated: Nov 18, 2019, 02:45 PM IST
भावाप्रती अपारशक्तीची 'ही' कृती पाहून तुम्हीही व्हाल थक्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) चा भाऊ अपारशक्ती खुरानाचा (Aparshakti Khurrana) आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अपारशक्तीचा चंदीगढमध्ये 18 नोव्हेंबर 1987 साली जन्म झाला. आयु्ष्मानप्रमाणे अपारशक्ती देखील लोकांमध्ये आपली ओळख बनवण्यात यशस्वी ठरला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

'दंगल', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'हॅप्पी फिर भाग जाएगी', 'स्त्री', 'लुका चुप्पी' आणि 'जबरिया जोडी' सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसलेला अपारशक्ती उत्तम सुत्रसंचालक देखील आहे. अनेक टीव्हीशोमध्ये तो सुत्रसंचालन करताना दिसतो. खासकरून स्पोर्टसवर त्याचं खास प्रभूत्व आहे.

काही दिवसांपू्र्वी मीडियाशी बोलताना अपारशक्ती म्हणाला होता की,'तो आपल्या मोठ्या भावाच्या म्हणजे आयुष्मान खुरानाच्या दररोज पाया पडतो.ही गोष्ट तो अनेक वर्षांपासून करत आहे. म्हणजे अपारशक्ती पाचवीत असल्यापासून आयुष्मानच्या मोठा भाऊ म्हणून पाया पडत आहे.'

कामाबद्दल बोलायचं झालं तर,अपारशक्ती लवकरच पती, पत्नी और वो सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर आहे. तसेच नुकतीच रिलीज झालेली 'कनपुरिये' ही वेब सिरीज धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांना त्याची ही कलाकृती अतिशय आवडली आहे. 

About the Author