तुम्ही बेडरूममध्ये Experiment करता का? मलायका अरोरा तिच्या खाजगी आयुष्यावरील प्रश्न ऐकून झाली हैराण

बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर उत्साही वातावरण निर्माण करते. मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मिडियावर चर्चेत असते.

Updated: Feb 28, 2023, 10:11 PM IST
तुम्ही बेडरूममध्ये Experiment करता का? मलायका अरोरा तिच्या खाजगी आयुष्यावरील प्रश्न ऐकून झाली हैराण title=

मुंबई : मुव्हिंग इन विथ मलायका या एपिसोडमध्ये करण जोहरने मलायकासोबत अशा अनेक गोष्टी विचारल्या, जे ऐकून ती स्वत: हैराण झाली. गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्यानं कायमच चर्चां रंगल्या. एकमेकांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून सुट्टीसाठी निवांत ठिकाणी जाण्यापर्यंत या दोघांची एकमेकांना साथ असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर उत्साही वातावरण निर्माण करते. मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मिडियावर चर्चेत असते. लोक त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल अनेकदा दोघांना ट्रोल करतात. मात्र या बिंधास्त मलायकाला काहीच फरक पडत नाही.

करण जोहरने मलायका अरोराला तिच्या बेडरूमचे रहस्य विचारलं
करणने मलायकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले. या एपिसोडमध्ये यावेळी अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आला होता आणि मलायकाला असे प्रश्न विचारले जे यापूर्वी कोणीही विचारले नव्हते.  करणने मलायकाला तिच्या शारिरीक संबधा संबंधित प्रश्न विचारले.

एपिसोडमध्ये, करणने मलायकाला प्रश्न विचाराला की, ती बेडवर अर्जुन कपूरसोबत कोणता नवीन एक्सपरिमेंट करते का. या प्रश्नावर मलायका लाजते यापुढे करण जोहर इथेच थांबला नाही, त्याने मलाइकाला आणखी एक वैयक्तिक प्रश्न विचारला.  

करण जोहरने मलायका अरोराला पुढे विचारले की ती शारिरीक संबध ठेवताना टॉय वापरते का? तिने अर्जुनच्या हातावर कधी हातकडी बांधली आहे का?   आणि मलायकाने कधी बेडरूममध्ये नर्सची भूमिका केली आहे का?

करणने त्याच्या बेडरूमचे रहस्य उघड केले
या प्रश्नांवर मलायका लाजू लागते, मग करण जोहर मलाइकाला नॉर्मल करण्यासाठी विषय बदलतो आणि   त्याच्या बेडरूमचं रहस्यही उघडतो. करणने खुलासा केला की तो एकदा बेडरूममध्ये रोलप्ले दरम्यान एका पोलिसाची भूमिका बजावत होता कारण त्यावेळी त्याला "सिंघम" व्हायचं होतं. असं करण जोहर म्हणाला आहे.

मलायका अरोरा आणि अरबाज यांच्या घटस्फोटानंतर तिची अर्जुन कपूरसोबतची जवळीक वाढू लागली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे बंध आणखी घट्ट झाले आहेत. मलायका अरोराने अनेकदा ती घटस्फोटानंतर कशी पुढे गेली हे देखील तिने सांगितलं.