यामी गौतमचा बहुचर्चित ‘आर्टिकल 370’ 'या' तारखेला होणार ओटीटीवर प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट?

 जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.

Updated: Apr 18, 2024, 09:29 PM IST
यामी गौतमचा बहुचर्चित ‘आर्टिकल 370’ 'या' तारखेला होणार ओटीटीवर प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट? title=

Article 370 OTT Release Date : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 77 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचे समीक्षकांसोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनीही कौतुक केले होते. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

नेटफ्लिक्सने ट्वीट करत दिली माहिती 

‘आर्टिकल 370’ हा चित्रपट लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. उद्या 19 एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने याबद्दल एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटले की, आताच तुमचे रिमाईंडर सेट करा. ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट उद्यापासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल, असे म्हटले जात होते. पण अखेर नेटफ्लिक्सने  ट्वीट करत याबद्दलची अपडेट दिली आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

यामी गौतम झळकली मुख्य भूमिकेत

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात काय परिस्थिती निर्माण झाली, यावर ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव हे कलाकारही झळकले होते. 

या चित्रपटाचे बजेट फक्त 20 कोटी रुपये होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 77 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केली होती. तर या चित्रपटाची निर्मिती व लेखन यामी गौतमचा पती आदित्य धर याने केलं होतं. सध्या यामी गौतम ही प्रेग्नेसीमुळे चर्चेत आहे. ती लवकरच आई होणार आहे. यामी ही येत्या मे 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे.