तो आधीच विवाहित होता... पतीबाबत अभिनेत्रीला कळलं आणि... 

ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी गेल्या पाच दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत

Updated: Feb 20, 2022, 06:17 PM IST
तो आधीच विवाहित होता... पतीबाबत अभिनेत्रीला कळलं आणि...  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी गेल्या पाच दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम करून खूप नाव कमावलंय. लग्नाच्या 32 वर्षांनंतर पहिल्यांदा अरुणा यांनी पती आणि चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचं असं खोटं उघड केलं, जे त्यांच्यासोबत लग्नाआधीच घडलं आहे. 

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचे अनुभव केले शेअर
अरुणा ईराणीने नुकतीच आपली पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वत:शी संबधित आणि कलाकारांसोबत केलेल्या कामाचा अनुभव देखील यावेळी अभिनेत्रीने  शेअर केला आहे. 

अरुणा आणि कुकू यांचं लग्न 1990 मध्ये झालं, जेव्हा त्या 40 वर्षांच्या होत्या. त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या की, त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर खूप भांडणाने झाली. पण लवकरच हे सगळं प्रेमात बदललं. त्यांनी सांगितलं की, चित्रपटादरम्यान कुकू मला आणि इतर सगळ्या कलाकार तोपर्यंत वाट पाहायला लावयचे जोपर्यंत धर्मेंद्र सेटवर येत नाहीत. आणि म्हणून मला त्याचा खूप राग यायचा कारण मी त्यावेळी इतरही काही चित्रपटांमध्ये काम करत होते. मला त्याचा खूप त्रास व्हायचा आणि तो मात्र मला धीर द्यायचा. त्या सगळ्या प्रकरणात आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो हेच आम्हाला समजलं नाही.  

कुकू कोहलीने लपवलं लग्नाचं सत्य 
अरुणाने या मुलाखतीमध्ये सांगितलं की, मी आणि कुकू जेव्हा भेटलो तेव्हा तो आधीच विवाहित होता. मात्र त्याने ही गोष्ट माझ्यापासून लपवली होती. मला या सगळ्याची कल्पनाच नव्हती आणि म्हणूनच मी हे नातं पुढे नेलं. अरुणा असंही म्हणाल्या की, मी त्यांच्या पत्नीबद्दल त्यांना कधीच विचारलं नाही.