मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरुंगात आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आणि गैरी मुलाला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. बुधवारी देखील न्यायालयात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली पण त्याला जामीन मंजूर झाला नाही. त्यामुळे आर्यनच्या कोठडीतील मु्क्काम वाढला आहे. अशात आर्यलचं समर्थन करण्यासाठी बॉलिवूडकर एकत्र आले आहेत.
आता कमाल आर खानने देखील आर्यनच्या जामीनबाबद प्रश्न उपस्थित केला आहे. केकेआर ट्विट करत म्हणाला, 'आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. हे संपूर्ण छळ केल्यासारखे दिसते. एखादी व्यक्ती 20 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात कशी राहू शकते? ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची ड्रग्स सापडले नाहीत.'
Aryan khan’s bail rejected and it is clear harassment. How can a person remain in jail for more than 20 days, who was not in possession of drugs neither consumed. While Bharti Singh was given bail on the same day, who was having 86 gm drugs. Means 2 laws for 2 different people.
— KRK (@kamaalrkhan) October 20, 2021
पुढे केकेआरने विनोद वीर भारती सिंहच्या ड्रग्स प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला, 'भारती सिंगला त्याच दिवशी जामीन मंजूर करण्यात आला, जेव्हा तिच्याकडे 86 ग्रॅम ड्रग्ज सापडले. म्हणजे दोन वेगवेगळ्या लोकांसाठी दोन कायदे...'
दरम्यान, विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकीलाने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, आर्यन खानच्या वकिलांनी यासंदर्भात हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.
न्यायालय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळीसाठी 4 नोव्हेंबरला सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे जर आर्यन खानला त्या आधी जामीन मिळाला नाही, तर त्याला दिर्घकाळासाठी तुरुंगात राहावे लागेल.