बीएमडब्ल्यूनंतर राखीला बॉयफ्रेंडकडून आणखी एक कोट्यवधींचं गिफ्ट; पाहून धक्का बसेल

राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

Updated: May 27, 2022, 03:18 PM IST
बीएमडब्ल्यूनंतर राखीला बॉयफ्रेंडकडून आणखी एक कोट्यवधींचं गिफ्ट; पाहून धक्का बसेल title=

मुंबई : राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राखीने खुलासा केला होता की, ती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. नुकतीच राखी बॉयफ्रेंड आदिलसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान तिने सांगितले की, ती आदिलसोबत दुबईला जात आहे. आता राखीने सांगितलं आहे की, आदिलने दुबईत तिच्या नावावर 
आलिशान घर घेतलं आहे.

राखी सावंत आदिलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत
रिअॅलिटी शो 'बिग बॉस 15'मधून बाहेर आल्यानंतर राखी सावंत चर्चेत राहिली होती. 'बिग बॉस'मध्ये तिने पती रितेशची सगळ्यांना ओळख करून दिली होती आणि काही काळानंतर तिने रितेशपासून वेगळं होण्याची घोषणाही केली होती. आता ती तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

राखीला  मिळाली करोडोंची भेट
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.  ज्यामध्ये दोघांनी एकमेकांचं खूप कौतुक केलं. राखीने सांगितलं की, आदिलने तिच्यासाठी दुबईत घर विकत घेतलं आहे. तो म्हणाला, 'आदिलने दुबईत माझ्या नावावर घर घेतलं आहे. यानंतर त्याने मला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली, पण खरं सांगायचं तर त्याचं प्रेम हाच माझा खरा खजिना आहे.

तो माझ्याबद्दल एकनिष्ठ आणि गंभीर आहे. नाहीतर कोणता मुलगा इतक्या लवकर आपल्या प्रेमाची ओळख घरच्यांना करून देतो. राखीने घराची किंमत सांगितली नाही. पण आदिलने दुबईत घर विकत घेतलं असेल तर त्याची किंमत करोडोंमध्ये नक्कीच असेल.

आदिल राखीसोबत मुंबईत डान्स अकादमी उघडणार आहे
याच मुलाखतीत आदिल खान दुर्रानी यांना राखीमध्ये कोणते बदल हवे आहेत असं विचारलं असता तो म्हणाला, 'आणखी काही नाही, तिने कमी ग्लॅमरस आणि जास्त झाकलेला ड्रेस घालावा अशी माझी इच्छा आहे.' राखी सावंतसोबत मुंबईत डान्स अॅकॅडमी सुरू करण्याचा विचार करत असल्याचंही आदिलने सांगितलं.