घरी परतताच आर्यन खानने केलं हे काम, पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जवळपास तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आलिशान बंगल्यात मन्नतमध्ये परतला आहे.

Updated: Oct 31, 2021, 06:02 PM IST
घरी परतताच आर्यन खानने केलं हे काम, पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही title=

मुंबई : शाहरुख खानचा लाडका आर्यन खान जवळपास तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आलिशान बंगल्यात मन्नतमध्ये परतला आहे. मुलाच्या घरी परतल्याने शाहरुख खान आणि गौरी खान खूप आनंदी दिसत आहेत. शनिवारी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड तुरुंगातून सुटल्यानंतर घरी पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी तसंच किंग खानच्या चाहत्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. आता याच दरम्यान आर्यन खानने घरी पोहोचताच एक मोठा निर्णय घेतला. जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख खान आणि गौरी खान त्यांचा मुलगा आर्यनच्या ड्रग्जप्रकरणामुळे खूप नाराज होते. त्यांनी आपल्या मुलाला तुरुंगातून मुक्त करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले मात्र आर्यनच्या अडचणी कमी करू शकले नाहीत. कोर्टाकडून अनेकवेळा तारखेवर तारीख मिळत होती, इतकं सगळं करूनही आर्यन जेलमधून बाहेर पडू शकला नाही. कोर्टाने आर्यनचे दोन जामीन रद्द केले होते, तिसऱ्या अर्जावर कोर्टाने आर्यनला जामीन मंजूर केला. घरी परतताना आर्यन खान खूपच भावूक झाल्याचं दिसत होता.

घरी परतल्यानंतर आर्यन खानने सर्वात मोठी गोष्ट केली ती म्हणजे त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरील त्याचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आर्यनने त्याच्या प्रोफाईलवरून त्याचा फोटो डिलीट केलाय. आता डीपीमध्ये फोटो नाही तर पांढरी पार्श्वभूमी दिसत आहे. इतकंच नाही तर आर्यनच्या काही जुन्या पोस्टही इंस्टाग्रामवर दिसत नाहीत. त्याने असं का केलं हे कोणालाही समजू शकलेलं नाही.

कैद्यांना मदत करण्याचं दिलं आश्वासन 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान जेव्हा तीन आठवडे तुरुंगात होता. त्यादरम्यान त्याची अनेक कैद्यांशी ओळख झाली. आर्यन खानने या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. यासोबतच कैद्यांवर जे काही खटले सुरू आहेत, त्यातही आम्ही मदत करू. तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी आर्यनने इतर कैद्यांची भेट घेतली आणि त्यांची गळाभेटही घेतली.