Asha Bhosle यांच्या मुलाची प्रकृती खालावली, परदेशातील रुग्णालयात दाखल

आशा भोसले सध्या मोठ्या संकटात.. मुलासोबत त्या देखील रुग्णालयात..  

Updated: Apr 15, 2022, 12:33 PM IST
Asha Bhosle यांच्या मुलाची प्रकृती खालावली, परदेशातील रुग्णालयात दाखल title=

मुंबई :  गायिका आशा भोसले सध्या मोठ्या संकटात आहेत. कारण त्यांच्या मुलाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार,  गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद यांची प्रकृती स्थिर नव्हती. त्यामुळे त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना अचानक भोवळ आल्याने ते जमिनीवर पडले. धक्कादायक म्हणजे त्यांना दुखापत देखील झाली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

त्यावेळी आनंद भोसले यांना प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना नॉर्मल रूममध्ये हलवण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, आशा भोसले त्यावेळी दुबईत होत्या. आता ही त्या मुलाजवळचं आहेत. 

या घटनेनंतर भोसले कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. प्रत्येकाला आनंद यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत आहे. सांगायचं झालं तर, आनंद भोसले हे आशा यांचे दुसरे पुत्र आहेत. 

आशा भोसले यांच्या पहिल्या मुलाचे नाव हेमंत होते, ते देखील चांगले गायक होते. 2015 मध्ये कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. याशिवाय आशा भोसले यांना एक मुलगी वर्षा होती, त्यांचे 2012 मध्ये निधन झालं.