गोरं होण्यासाठी 9 हजार रुपयांचं इंजेक्शन घे; सल्ला ऐकताच हडबडली Esha Gupta

सावळ्या वर्णावरुनही तिला विचित्र सल्ले देण्यात आले होते.   

Updated: Jun 10, 2022, 10:01 AM IST
गोरं होण्यासाठी 9 हजार रुपयांचं इंजेक्शन घे; सल्ला ऐकताच हडबडली Esha Gupta  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'आश्रम 3' या वेब सीरिजमध्ये एकाहून एक सरस बोल्ड सीन देणारी ईशा गुप्ता हल्ली बरीच चर्चेत असते. ईशानं एक फोटो पोस्ट करायचा खोटा, लगेच त्या फोटोच्या बातम्या झाल्याच म्हणून समजा. गेली बरीच वर्षे ईशा हिंदी कलाजगतामध्ये बहुविध भूमिका साकारताना दिसत आहे. (ashram fame actress esha gupta once suggested to get injection to become fair)

तिचा प्रवास किंवा तिला मिळणारी लोकप्रियता डोळे दिपवणारी असली, तरीही ईशाचा हा प्रवास मात्र फारसा सोपा नव्हता. सावळ्या वर्णावरुनही तिला विचित्र सल्ले देण्यात आले होते. 

एका मुलाखतीत खुद्द ईशानंच याबाबतचा खुलासा केला. गोऱ्या वर्णालाठी तू इंजेक्शन घे, असा सल्ला तिला एका व्यक्तिनं दिला होता. बरं, इशानंही या इंजेक्शनची किंमत काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. हे एक इंजेक्शन 9 हजार रुपयांना असल्याचं तिला कळलं होतं.  

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला नाकावरूनही बरेच सल्ले मिळाले होते. नाक गोलाकार असल्यामुळं ते टोकदार करुन घेण्यासाठीही सर्जरी करण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. 

कलाजगतातील हे वास्तव मांडताना बऱ्याच अभिनेत्रींवर चांगलं दिसण्याचा दबाव असतो असं तिनं सांगितलं. आपल्याला मुलगी झाल्यास तिनं अभिनेत्री होऊ नये, कारण कमी वयातच तिच्याकडून सुंदर दिसण्याची अपेक्षा केली जाईल, तिला सर्वसामान्य आयुष्य जगता येणार नाही असं ईशा म्हणाली. आपल्या मुलीनं अॅथलीट व्हावं हे तिनं अधोरेखित केलं. 

2012 मध्ये ईशानं 'जन्नत 2' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली खरी, पण 'आश्रम 3'मधील ग्लॅमरस भूमिकेनं तिला विशेष लोकप्रियता दिली.