अश्विनी भावेंनी लॉन्च केली खास वेबसाईट

मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवणार्‍या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत स्थित आहेत.

Updated: Sep 19, 2017, 10:29 PM IST
अश्विनी भावेंनी लॉन्च केली खास वेबसाईट  title=

मुंबई : मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवणार्‍या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत स्थित आहेत.

काही दिवसांपूर्वी काळ्या गाऊनमध्ये अश्विनी भावे यांनी एक फोटो शेअर केला. आगामी चित्रपटासाठी हे फोटोशूट केले असावे असा अंदाज रसिकांमध्ये होता. मात्र अश्विनी भावे यांनी त्यांच्या वेबसाईट लॉन्च साठी ही तयारी केली होती. 

 

जगभरातील  चाहत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी अश्विनी भावे हिनं स्वत:ची वेबसाइट लाँच केली आहे.
 अश्विनी भावेंचे एक्सक्लुसिव्ह फोटो हे या वेबसाइटचं खास वैशिष्ट्य आहे. 
 
 'अशी ही बनवाबनवी’, 'कळत नकळत’, 'झुंज तुझी माझी’, 'वजीर’ यांसारख्या मराठी चित्रपटात काम केल्यानंतर १९९१ मध्ये ’हिना’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. 'हनिमून’, 'मोहब्बत की आरझू’, 'अशांत’, 'सैनिक’, 'जखमी दिल’या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने हिंदी सिनेमातही त्यांनी छाप पाडली.