Cake for ancer: वाढदिवस असो की लग्नाचा दिवस केक कापण्याची पाश्चात्य प्रथा भारतात तळागाळापर्यंत रुजलीये. जन्मापासून निवृत्तीच्या दिवसापर्यंत केक कापून सेलिब्रेशन केलं जातं. पण सेलिब्रेशनचा प्रतिक असलेला केक कॅन्सरला कारण ठरलाय. विशेषतः वेलवेटचा केक कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायेत.
भाईचा बर्थडे असो की लग्नाचा वाढदिवस.... प्रसंग कोणताही असो... केक कापलाच पाहिजे... सेलिब्रेशनमधील महत्वाचा घटक म्हणजे केक. आजकाल वाढदिवसासाठी केक आणण्याची प्रथा आहे. त्यामुळं एकाचवेळी चार-चार पाच-पाच केक कापले जातात. एंगेजमेंट असेल तर कापर केक तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याची माहिती समोर आलीय. रंगबेरंगी केक गंभीर आजाराचं कारण होऊ शकतात. हेच केक तुम्हाला ब्लड कँन्सर, ट्युमर आणि किडनीच्या आजारापर्यंत नेऊ शकतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हायरल मॅसेजनुसार
कोणत्या केकमुळे कोणता धोका?
रेड वेलवेट केकमुळं थायरॉईड, ट्युमर होऊ शकतो. निळ्या वेलवेट केकमुळं ब्रेन कॅन्सर होण्याचा धोका असतो. हिरव्या वेलवेट केकमुळं ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता असते. पिवळ्या वेलवेट केकमुळं किडनी फेल्युअर, कॅन्सरचा धोका होऊ शकतो
लहान मुलांना केक खूप आवडतात. पण वेलवेट केक खाल्यानं लहान मुलांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागेल असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
बर्थडेला वेगवेगळ्या केकची क्रेझ आहे. या क्रेझला बळी पडू नका. शक्यतो असे केक आणणं किंवा खाणं टाळा. हा वेलवेट केक खरेदी करणं म्हणजे कॅन्सर विकत घेण्यासारखं आहे. त्यामुळं राहा सावधान.