'असूर 2' साठी अर्शद वारसीनं घेतली तगडी फी

Asur 2: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे असूर 2 या वेबसिरिजची त्यामुळे चाहत्यांनासाठीही ही एक नवी पर्वणीच ठरली आहे. कारण या सिरिजच्या पहिल्या भागाला तूफान प्रतिसाद मिळाला होता. पण तुम्हाला माहितीये का की अर्शद वारसी यांनी या सिरिजसाठी किती फी घेतली आहे? 

Updated: Jun 10, 2023, 04:16 PM IST
'असूर 2' साठी अर्शद वारसीनं घेतली तगडी फी title=

Asur 2: सध्या जमाना आहे तो म्हणजे वेबसिरिजचा. त्यामुळे सगळीकडेच त्यांची चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे असूर 2 या वेबसिरिजची. या वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले आहे. ही सिरिज सध्या सगळीकडेच गाजते आहे. या सिरिजनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. सध्या या सिरिजमधून तगडे स्टारकास्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे आवडते कलाकारही या सिरिजमध्ये आहेत. या वेबसिरिजसाठी सगळ्यांनीच तगडी फी घेतली आहे. त्याचबरोबर या सिरिजमध्ये सर्वाधिक भुमिका गाजते आहे ती म्हणजे अर्शद वारसी यांची. चित्रपटांतून दमदार अभिनय केल्यानंतर अर्शद वारसी हे ओटीटीवर आले आहेत. 

या प्लॅटर्फोमवरही त्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकून घेतले आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की, अर्शद वारसी यांनी या वेबसिरिजसाठी किती मानधन घेतलं आहे. एका हिंदी वृत्तपत्राच्या वेबपोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, अर्शद वारसी यांनी या शोसाठी 1.5 कोटी इतके मानधन घेतलं आहे. त्यामुळे सध्या त्यांची चांगली चर्चा रंगली आहे. त्यांच्या नेटवर्थचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. अर्शद वारसी ही जितके त्यांच्या सिनेमांसाठी ओळखले जातात. तितकेच ते आपल्या अभिनयासाठीही ओळखले जातात. सध्या या वेबसिरिजचे रिव्ह्यूही चांगले येत आहेत. या सिरिजमधील कथा, अभिनय, दिग्दर्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. 

या सिरिजमधील इतर कलाकारांनीही तगडी फी घेतली असल्याचे बोलले जाते आहे. अर्शद वारसी हे आपल्या पर्सनल लाईफसाठीही ओळखले जातात. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्यांच्या मुलीचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सोबतच त्यांच्या युनिक लव्हस्टोरीबद्दलही त्यांच्या चाहत्यांना कुतूहल असते. 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगेरहो मुन्नाभाई या चित्रपटातील त्यांच्या सर्किटच्या भुमिकेमुळे ते कायमच चर्चेत असतात. हा सिनेमा पाहिल्यावर त्यांच्या भुमिकेबद्दल कोणी बोललं नाही तरच नवलं. 

90 च्या दशकात मोठं मोठे हिरो स्पर्धेत असताना त्यांच्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. सध्या त्यांनी ओटीटीवर आपला जम बसवला आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन फॉलोईंगही मध्ये तूफान त्यांची तूफान चर्चा असते. सध्या या सिरिजमधून त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अनेक लोकं खासकरून त्यांच्या या सिरिजमधील अभिनयासाठी फिदा आहे. तुम्हीही ही वेबसिरिज पाहिलीत का? नसेल तर अजिबातच चुकवू नका.