अर्पिताच्या पतीकडून महिलेची फसवणूक, सलमान खानने अपेक्षा पण केली नसेल

आयुष शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  

Updated: Jan 19, 2022, 12:38 PM IST
अर्पिताच्या पतीकडून महिलेची फसवणूक,  सलमान खानने अपेक्षा पण केली नसेल  title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेकांना बॉलिवूडमध्ये नवीन संधी उपलब्ध करून त्यांच्या करियरसाठी एक मार्ग मोकळा करून दिला. त्याचप्रमाणे सलमानने  त्याच्या लाडक्या बहिणीचा पती आयुष शर्माला देखील बॉलिवूडमध्ये संधी उपलब्ध करून दिली. 'अंतिम' चित्रपटात सलमान आणि आयुषने एकत्र काम केलं. आता चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये आयुषला एक फोन कॉल आला आहे, हा कॉल लोन देणाऱ्या एका महिलेचा आहे. त्या महिलेसोबत आयुष मुदस्सर खान म्हणून बोलताना दिसत आहे. फोन कॉलवर बोलून झाल्यानंतर आयुष महिलेला मजेशीर अंदाजात म्हणाला, मी तुमची फसवणूक करत होतो. पाहा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ आयुषने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये सलमानला टॅग करत म्हणाला, 'मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला..पण भाईचं लोन रिजेक्ट झालं....'

आयुषचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x