बाजी पहिला एपिसोड : बाजीची लक्षवेधी सुरूवात

पाहा पहिला भाग 

मुंबई : झी मराठीवर पेशवाईचा काळ उभी करणारी नवी 'बाजी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. थोडीशी गो. नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांची जी शैली आहे त्या पद्धतीची ही कथा आहे. 

मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये पात्रांची ओळख दाखवली आहे. हिरा हे पात्र नुपूर दैणठकरने साकारलं आहे तर  बाजीचं पात्र अभिजीत श्वेताचंद्रने साकारलं असून शेरा ज्याला पेशव्यांना संपवण्यासाठी शंभर दिवसांची मुदत दिली जाते ते पात्र प्रखरसिंह साकारत आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये हिरा आणि बाजीच्या प्रेमाच्या गोष्टीला सुरूवात झाली आहे. तर शेरा आणि इंग्रज मिळून कोणतं कट कारस्थान रचणार आहेत याची चाहुल देखील पहिल्याच भागात झाली. पेशवाईच्या काळात इंग्रजांनी केलेली खुसखोरी या मालिकेत पाहायला मिळणार आहे . त्या वेळी पुण्यात तळ्यातील गणपती चोरीला गेला होता, त्यानंतर तळेगावातील पेशव्यांच्या गोदामांना आग लावण्यात आली होती, कात्रजच्या तलावात विष टाकण्यात आले होते, अशा काही घटनांचा संदर्भ घेत ही कथा गुंफण्यात आली आहे