बापरे...! अभिनेत्री प्रिती झिंटा आहे ३४ मुलांची आई

अभिनेत्री प्रिती झिंटा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीबद्दल असा एक किस्सा सांगणार आहोत जो ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

सायली कौलगेकर | Updated: Feb 4, 2024, 12:17 PM IST
बापरे...! अभिनेत्री प्रिती झिंटा आहे ३४ मुलांची आई title=

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा ही अशी अभिनेत्री आहे जिचं फॅनक्लब खूप मोठं आहे. प्रिती झिंटा तिच्या काळातली टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रितीने अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. तिच्या अभिनयाचं आजही तितकच कौतुक प्रेक्षकांकडून केलं जातं. प्रितीने आत्तापर्यंत 'दिल चाहता है', 'दिल से', 'कभी अलविदा ना कहना', 'सलाम नमस्ते' यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमांत प्रितीने काम केलं आहे. ज्या सिनेमाला आजही प्रेक्षकांकडून तितकच प्रेम मिळतं. ब्लॉकब्लस्टर सिनेमा दिल्यानंतर प्रिती झिंटाने बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. ज्यानंतर तिचं फल्मी करिअर डूबलं. मात्र प्रितीने फार कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळवली. जाणून घेवूयात प्रितीबद्दल असा एक किस्सा जे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

डिंपल गर्ल म्हणून घरा-घरात पोहचलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्रिती झिंटा डिंपल गर्ल म्हणून ओळखलं जातं. एवढंच नव्हेतर तिला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि तिच्या चुलबूल्या अंदाजामुळे ओळखलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीविषयी असं काही सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. अभिनेत्री प्रिती झिंटा चक्क 34 मुलांची आई आहे. होय हे खरंय.

३४ मुलांची आई आहे प्रिती झिंटा
जितकी सुंदर प्रिती झिंटा आहे. तितकंच सुंदर तिचं मनदेखील आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, प्रिती एक दोन नव्हेतर चक्क ३४ मुलांची आई आहे. खंरतर २००९ मध्ये प्रिती झिंटाने  ऋषिकेषसोबत 34 अनाथ मुलांना दत्तक घेतलं आहे. मुख्य म्हणजे ही गोष्ट तेव्हाची आहे ज्यावेळी प्रितीचा वाढदिवस होता. वाढदिवसादिवशी प्रितीच्या आयुष्यात ही 34 गोडं मुलं आली. मुख्य म्हणजे प्रिती या 34 मुलांचा संभाळं खूप उत्तमरित्या करते. असं म्हटलं जातं की, प्रिती तिच्या या 34 मुलांना वर्षातून दोनदा भेटायला देखील जाते.

2016 मध्ये परदेशात बांधली लग्नगाठ
प्रिती झिंटाने 2016 साली लग्न केलं. तिने अमेरिकन सिटीजन जीन  गुडइनफसोबत 29 फेब्रुवारीला परदेशात गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा लॉस एंजिलसमध्ये पार पडलं होतं. प्रितीच्या लग्नाची बातमी जवळ-जवळ सहा महिन्यानंतर मीडियासमोर आली होती. जी बातमी समोर येताच वाऱ्यासारखी पसरु लागली. तिच्या लग्नाची बातमीने सगळेच हैराण झाले होते.