बाहुबली फेम स्टारच्या घरी होणार चिमुकल्या पाहूण्याचं आगमन; अधिकृत घोषणेची वाट पाहताहेत चाहते

बाहुबली स्टार अभिनेत्याच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Updated: Oct 26, 2022, 06:37 PM IST
बाहुबली फेम स्टारच्या घरी होणार चिमुकल्या पाहूण्याचं आगमन; अधिकृत घोषणेची वाट पाहताहेत चाहते title=

मुंबई : बाहुबली स्टार राणा डग्गुबती याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. राणा दग्गुबती आणि मिहिका बजाज यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघंही आपल्या पहिल्या अपत्याची वाट पाहत आहेत. मिहिका गरोदर असल्याची बातमी आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी सोशल मीडियावर ही चर्चा जोरदार सुरू असून राणा डग्गुबतीचे चाहते याबाबत खूप खूश आहेत.

वास्तविक, या अभिनेत्याने यापूर्वी सोशल मीडियातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. मात्र मिहिका बजाज सतत तिच्या आयुष्यातील अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतीच तिने करवा चौथवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यानंतर त्यांच्या दोघांच्याही संसाराच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र या जोडप्याच्या घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

इंस्टाग्रामवर फोटो
राणा दग्गुबती आणि मिहिका बजाज यांचं ऑगस्ट २०२० मध्ये हैद्राबादमध्ये लग्न झालं. एका छोट्याशा समारंभात दोघांचं फक्त कुटुंबीयच उपस्थित होतं. अलीकडे, जेव्हा राणा दग्गुबतीच्या पत्नीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये दोघांचे हात दिसत आहेत, त्यामुळे ते पाहिल्यानंतर आणि त्यावर लिहिलेली पोस्ट वाचून ते कुटुंब वाढवत आहेत आणि लवकरच त्यांच्या या गुडन्यूजची घोषणा करतील, असा समज लोक करत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहुबली अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवरील सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. तसंच तो काही काळ सोशल मीडियापासून दूर जात असल्याचंही त्याने सांगितलं.

राणा दग्गुबतीने सोशल मीडियातून माघार घेतल्यानंतर, कदाचित त्याच्या आणि मिहिकाच्या आयुष्यात सर्व काही ठीक नाही अशी अटकळ बांधली जात होती. मात्र या स्टारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता मिहिकाची पोस्ट समोर आल्याने तिच्या चाहत्यांच्या चिंतेचे रूपांतर आनंदात झालं आहे. मिहिकाच्या पोस्टवरून हे स्पष्ट झालं आहे की, त्यांच्या नात्यात कोणतीही अडचण नाही, परंतु हे दोघंही लवकरच त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन सदस्याची घोषणा करतील. दरम्यान, राणा दग्गुबती तिच्या पुढील वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.