चित्रपटात दिला न्यूड सीन, 'या' सीननंतर अभिनेत्रीला लपवावा लागला चेहरा

अभिनेता-अभिनेत्री म्हटलं तर त्यांच्या वाट्याला अनेक रोल येतचं असतात.

Updated: Jun 12, 2022, 03:47 PM IST
चित्रपटात दिला न्यूड सीन, 'या' सीननंतर अभिनेत्रीला लपवावा लागला चेहरा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता-अभिनेत्री म्हटलं तर त्यांच्या वाट्याला अनेक रोल येतचं असतात. काही रोल आयुष्याला कलाटणी देतात, तर काही रोल्स आयुष्य उद्ध्वस्त देखील करू शकतात. असाच एक अनुभव एका अभिनेत्रीला आला आहे. या चित्रपटासाठी तिने न्यूड सीन दिला. मात्र या सीननंतर तिच्यावर चेहरा लपवण्याची वेळ आली होती. हा चित्रपट? आणि ही अभिनेत्री कोण होती? जाणून घ्या... 

'बॅन्डिट क्वीन' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हद्यावर एक वेगळीच छाप सोडली होती. या चित्रपटात फुलन देवीची खरी कहाणी दाखवण्यात आली असून प्रत्येक पात्राची खूप प्रशंसा झाली होती. चंबळची राणी फूलन देवीची भूमिका साकारण्यासाठी सीमाने खूप मेहनत घेतली होती. तिने फुलन देवीसारखे तिचे आयुष्य घडवले होते. या भूमिकेनंतर सीमा बिस्वास रातोरात स्टार झाली होती.  

न्युड सीनमुळे वाद

सीमा बिस्वास यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या पण आजही त्यांना 'बँडिट क्वीन' म्हणून ओळखले जाते. 'बॅन्डिट क्वीन' या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती, आणि त्यामागचे कारण होते ते म्हणजे चित्रपटात चित्रित केलेला एक बलात्काराचा सीन. ज्यावरून बराच वाद झाला होता. या सीनमध्ये अभिनेत्रीला न्यूड होऊन संपूर्ण गावात फिरावे लागले. या एका न्यूड सीनने चित्रपटाची सगळी लाइमलाइट लुटली होती. 

सीमा काय म्हणाल्या?
सीमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटातील एका न्यूड सीनमुळे तिला रात्रभर रडावे लागले होते. हा सीन तिने स्वत: केला नसून बॉडी डबलने केला असल्याचे त्यांनी सांगितले. असे असतानाही त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती, पण त्याच्या कुटुंबीयांना ही गोष्ट माहीत होती, त्यामुळे कोणालाच स्पष्टीकरण द्यावे लागले नाही.

दरम्यान या चित्रपटातील अनेक वादग्रस्त दृश्यांमुळे चित्रपटगृहात बंदी घालण्यात आली होती. पण असे असतानाही हा चित्रपट लीक झाला आणि लोकांनी हा चित्रपट पाहिला.