IPL ऑक्शनमध्ये शाहरुखने तोंड दाखवणं टाळलं, पण अखेर ते कारण समोर आलंच...

पण आता मात्र त्याचे फोटो व्हायरल झाल्याने हा लूक चाहत्यांसमोर आला आहे

Updated: Feb 21, 2022, 08:04 PM IST
 IPL ऑक्शनमध्ये शाहरुखने तोंड दाखवणं टाळलं, पण अखेर ते कारण समोर आलंच... title=

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतो. शेवटचा शाहरुख दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी दिसला. यावेळी देखील शाहरुख बराच चर्चेत होता.

त्यानंतर यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये शाहरुख दिसला नाही, वडिलांच्या जागी आर्यन खान आणि सुहाना खान यांनी ऑक्शनमध्ये हजेरी लावली होती.

शाहरुख गैरहजर का होता याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. नक्की काय घडलं की शाहरुखने आयपीएल ऑक्शनमध्ये येणं टाळलं असा प्रश्न अनेकांना पडला होता.

आता सध्या अभिनेत्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे एकच चर्चा रंगते आहे. या फोटोत तो लांब केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून लोक वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

नुकतंच शाहरुखला स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी तो नवीन लूकमध्ये दिसला. हा लूक समोर येऊ नये यासाठी त्याने आयपीएल ऑक्शनमध्ये हजेरी न लावल्याचं आता बोललं जात आहे. 

पठान हा शाहरुखचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख या सिनेमाचं शुटींग करत असल्याची ही बातमी समोर आली होती. 

आता असं बोललं जात आहे की, याच सिनेमासाठी त्याने लाँग हेअर असा लूक केला आहे. हा लूक रिवील होऊ नये यासाठी शाहरुखने आयपीएल ऑक्शनमध्ये जाणं टाळलं होतं.

लंबे बाल और सफेद दाढ़ी में नजर आए शाहरुख खान, ये क्या हो गया किंग खान का हाल

पण आता मात्र त्याचे फोटो व्हायरल झाल्याने हा लूक चाहत्यांसमोर आला आहे. स्वत:चा चेहरा लपवणाऱ्या शाहरुखचा नवा लूक अखेर सगळ्यांसमोर आला आहे.