सिद्धार्थच्या त्या अर्ध्या तासाच्या कॉलची History समोर

 सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत, सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना हादरवून सोडले आहे.

Updated: Sep 14, 2021, 06:38 AM IST
सिद्धार्थच्या त्या अर्ध्या तासाच्या कॉलची History समोर

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत, सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना हादरवून सोडले आहे. त्याचवेळी, बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत घरात राहिलेला टीव्ही अभिनेता विशाल आदित्य सिंह याने सिद्धार्थसोबतच्या शेवटच्या भेटीवेळी झालेल्या संभाषणाबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 

सिद्धार्थच्या मृत्यूच्या 2-3 दिवस आधी विशालची भेट

एका मुलाखतीत विशाल आदित्य सिंगने खुलासा केला की, मृत्यूच्या 2-3 दिवस आधी त्याने सिद्धार्थची भेट घेतली होती. मात्र, बिग बॉस 13 मध्ये त्यांच्यात झालेल्या वादानंतर ते एकमेकांसोबत बोलत नव्हते. पण खतरों के खिलाडी 11 मधील विशालच्या चमकदार कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सिद्धार्थने विशालचा नंबर कुठून तरी घेतला.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थने विशालला केला होता कॉल

विशाल म्हणाला, "सिद्धार्थ आणि मी खूप एकमेकांसारखे होतो, स्वतःच्या जगात आनंदी असणाऱ्या व्यक्तींप्रमाणे. बिग बॉस 13 मध्ये वाद झाल्यानंतर आम्ही बोलणे बंद केले आणि पुन्हा भेटण्याचा प्रयत्नही केला नाही. सिद्धार्थची आई आणि बहिणीने माझे खतरो के खिलाडी मधील स्टंट पाहिले होते. त्यानंतर सिद्धार्थने मला कुठून तरी फोन केला आणि म्हणाला, 'मी हे कधीच करू शकणार नाही. तू हे केलेस.''

विशाल पुढे म्हणाला, "आम्ही अर्धा तास बोललो. त्यानंतर त्याने मला भेटण्यासाठी मेसेज केला आणि आम्ही भेटलो. सिद्धार्थला भेटल्यानंतर फक्त २-३ दिवस लांब त्याच्या मृत्युची बातमी समोर आली, जी खूप धक्कादायक होती.