भारत असो विदेश प्रत्येक व्यक्ती इथे चांगलं आयुष्य जगण्यासाठी कमवतात. पण चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. वाढणारी महागाई आणि इतर खर्च याचा ताळमेळ जमवता जमवता सर्वसामान्याचे कंबरड मोडतं. प्रत्येकाला सुखात जगता यावं म्हणून आर्थिक नियोजन करण्यावर भर दिला जातो. सोशल मीडियावरील X (पूर्वीचे ट्विटर) वर अविरल भटनागरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने विचारलं की, भारतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज असते. यानंतर सोशल मीडियावर वाद पेटलाय.
आयआयटी बॉम्बे आणि आयआयएम बंगलोरचे माजी विद्यार्थी, अविरल यांनी आपल्या X वरील प्रोफाईलवर हा प्रश्न टाकला आणि त्यानंतर एकच उत्तरासाठी एकच धुमाकूळ पाहिला मिळतेय. भारतात कुठेही आरामात राहण्यासाठी ₹1.5 लाख मासिक खर्च पुरेसा आहे, असं एका वापरकर्त्याने म्हटलंय. शिवाय परदेशात सुट्ट्यांसारख्या अतिरिक्त लक्झरी तुम्हाला ₹2 लाख प्रति महिन्याची गरज असते. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की असं खर्च अंदाजे ₹4.8 कोटीच्या निधीसह शाश्वतपणे व्यवस्थापित केलं जाऊ शकतं. दरवर्षी 5% सह तुम्ही ते कव्हर करू शकता
1.5L/month is more than enough to live well anywhere in India
If you want more than being in the top 1% and add luxuries like foreign vacations, take it to 2L/month
You can cover this with 5% each year on a ~4.8Cr corpus, the remaining returns compound
More is good, not need
— Aviral Bhatnagar (@aviralbhat) November 23, 2024
त्यांनी लिहिलंय की, भारतात कुठेही चांगले आयुष्य जगण्यासाठी 1.5 लाख महिना पुरेसा आहे, तर तुम्हाला पहिल्या टॉप 1% मध्ये राहायचं असेल तर आणि परदेशी सुट्ट्यांसारख्या लक्झरी लाइफ पण हवी असेल तर तुम्हाला महिन्याला 2 लाख पैसे कमवावे लागतील. तुम्ही प्रत्येक वर्षी 5% सह कव्हर करू शकता.
1.5L/month is more than enough to live well anywhere in India
If you want more than being in the top 1% and add luxuries like foreign vacations, take it to 2L/month
You can cover this with 5% each year on a ~4.8Cr corpus, the remaining returns compound
More is good, not need
— Aviral Bhatnagar (@aviralbhat) November 23, 2024
दुसऱ्या एका युजर्सने याच X थ्रेडमध्ये, पुढे म्हटलय की, 'ज्यांनी अनुसरण केले नाही त्यांच्यासाठी हे आहेत खर्च आणि उत्पन्न नाही करपूर्व/पोस्ट-टॅक्सचा प्रश्न अप्रासंगिक आहे .अधिक कमावण्याच्या महत्त्वाकांक्षेवर, कृपया मोकळ्या मनाने आकांक्षा बाळगा. जरी पैसा तुमची एकमेव महत्त्वाकांक्षा असेल तर तुम्हाला ते जवळजवळ नेहमीच मिळणार नाही.' अविरलने नंतर स्पष्ट केलंय की, त्याची गणना मासिक खर्चाशी संबंधित आहे, उत्पन्नाशी नाही आणि निदर्शनास आणले की करपूर्व आणि करोत्तर कमाईमधील फरक या संदर्भात अप्रासंगिक असतो. वापरकर्त्यांनी या आकडेवारीच्या व्यवहार्यतेबद्दल आणि आर्थिक शिवाय वैयक्तिक उद्दिष्टांवरील व्यापक परिणामांबद्दल विविध दृष्टीकोन सामायिक करून या पोस्टने एक एक वादविवाद मात्र नक्कीच सुरुवात केलीय.